Sunday 20 February 2022

आई

 आई

नसे तिच्या मायेला अंत
करे मायेने संगोपन, 
धरुनी बोटाला, शिकवी चालायला
म्हणुनी  काऊ-चिऊचा, 
घास भरवी मऊ-मऊ भाताचा

दफ्तर छोटस , डब्बा पोळी-भाजीचा
धरुनी  बोटआईचे,
 मी जाई रोज शाळेला 
सायंकाळी येऊनी मी शाळेतुन, 
खाऊनी गरम ,जाई रोज खेळायला

घेई रोज अभ्यास माझा
गुण चांगले मिळवुनी, 
देई शाब्बासकी मला

पुरवी हट्ट माझे
जास्त जिद्दी झाली की, 
देई वरतुनी धपाटे
घेऊनी जवळ पुसे अश्रु माझे
हात मायेचा फिरवुनी पाठीशी, 
शांत करी मला

चिमुकली मी आज झाली मोठी
एके दिवशी उडुनी जाई परक्या घरी, 
तेव्हा  येई आठवण तुझी......

                  _EktachUdhari

No comments:

Post a Comment

आयुष्याचं साधन एक पुस्तक.....

आयुष्याचं साधन एक पुस्तक..... जिवनातला दुसरा आरसा म्हणजे पुस्तक आयुष्याच्या प्रवासात,  जग पालटुन टाकणार साधन म्हणजे पुस्तक, आपल्यकडे कसली तक...