Sunday 27 February 2022

राष्ट्रीय विज्ञान दिन....

राष्ट्रीय विज्ञान दिन.... 

आज २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. देशाचे महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांनी आजच्या दिवशी  त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आज देशभरातील शाळा, महाविद्यालयात विज्ञान दिन साजरा केला जातो.
महान वैज्ञानिक भौतिक शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी भौतिकच्या गंभीर विषयावर एक महत्त्वपूर्ण शोध लावला होता. पारदर्शी पदार्थ मधून जाणाऱ्या प्रकाशांचा किरणात बदल करणारा हा बदल रामन यांनी शोधून काढला. त्यामुळे त्यांना १९३० साली भौतिकमध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार मिळवणारे ते केवळ पहिले भारतीय नव्हते तर आशियातील पहिले व्यक्ती होते. हा शोध लावल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ १९८६ पासून देशभरात या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. आज तसेच भारत या देशाला महान वैज्ञानिक परंपरा लाभली आहे. तसेच भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे देखील एक वैज्ञानिक च होते.

                     देशाच्या निर्मिती साठी विद्यानाची गरज आहे.
परंतु आपल्या देशातील काही भागात अंधश्रद्धा आणि रुढी-परंपरां दिसुन येत होत्या.आज विद्यानामुळे कमी प्रमाणात आढळून येते. विद्यानामुळे च हे चित्र पालटलेले दिसुन येत आहे. विद्यानामुळे संपूर्ण भारत देश समोर गेला आहे.
आज जगभरात "राष्ट्रीय विज्ञान दिन " साजरा करण्यासाठी काॅलेज, शाळा येथे प्रोजेक्ट ठेवल्या जात आहे व त्यातून माहिती प्राप्त करून घेत आहे.
देशाच्या विकासासाठी वैज्ञानिक विचारसरणीचा प्रसार आणि प्रचार होणे गरजेचे आहे . विद्यानामुळे, विद्यानाच्या सर्व शोधांनी सामान्य माणसाला देखील फायदा झालेला आहे. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या विद्यानाचे (science) चे महत्व सांगण्यासाठी राष्ट्रीय विद्यानदिन जगभरात साजरा करतात.

                           विज्ञानामुळे आपली प्रगती खूप वेगाने होत आहेच या शिवाय आपल्या समाजातील अंधश्रद्धा या ज्ञानामुळेच नष्ट झाल्या आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन हे विज्ञानामुळे झालेले चांगल्या प्रगतीचे लक्षण आहे. विज्ञानामुळे तरुण पिढीला नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लोकांना आर्थिक दृष्टिकोनातून विज्ञानाचा चांगला फायदा होत आहे. आपल्याला ज्या सुखसोई आता उपलब्ध आहेत, त्या फक्त आणि फक्त विज्ञानामुळे आहेत. विघ्यानक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान देखील केला जातो.
आणि लहान मोठ्या शोध, संशोधनांना प्रेरणा मिळावी ह्यासाठी अनेक योजना देखील जाहीर केल्या जातात. विज्ञान क्षेत्रात आज मोठ्या प्रमाणात प्राधान्य लाभलेले आहे.अतुलनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान देखील केला जातो.

               समाजात जनजागृती  करण्यासाठी तसेच , विज्ञानाची विचारसरणी जनमाणसात रुजू करण्यासाठी विज्ञान दिवस साजरी होणे महत्त्वाचे आहे. 
तर आज राष्ट्रीय विज्ञान दिन ह्या दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा.......! 

                       _ एकता चौधरी

मराठी राजभाषा दिन.....

मराठी राजभाषा दिन..... 

                       २७ फेब्रुवारी,आज मराठी राजभाषा दिन आपल्या महाराष्ट्राचे जेष्ठ कवी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन किंवा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. आज मराठी भाषा दिन असून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आपल्या मातृभाषेचा म्हणजे मराठीचा खूप अभिमान आहे. तसेच कवी कुसुमाग्रज यांनी आपल्या मराठी भाषेच्या सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. 
त्यामुळे कवी कुसुमाग्रज यांना अभिवादन आणि मराठी भाषेचा गौरव म्हणून दरवर्षी 'मराठी भाषा दिन' साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांचे संपूर्ण नाव विष्णु वामन शिरवाडकर आहे. 
   
                     

                  मराठी भाषा हा दिवस सर्वात जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा करतात. महाराष्ट्रातील लोकांना मराठी भाषेचा खुप अभिमान आहे. खंरतर संवादाचे मुख्य साधन म्हणजेच मराठी भाषा. मराठी भाषा ही मराठी संस्कृतीची ओळख आहे. मराठी मुल जन्माला आलं तेव्हा त्याचा पहिला शब्द हा मराठी मधूनच उद्धगारतो. मग तो शब्द आई असो किंवा बाबा असो. मराठी भाषा ही सर्वानसाठी खास असलीच पाहिजे, मराठी भाषेचा अभिमान आपल्या सर्वाना असलाच पाहिजे. परंतु आजच्या परिस्थितित इंग्रजी भाषेवरच ज्याचा त्याचा जोर दिसत आहे. परंतु इग्रंजी भाषा बोलतांना मराठी भाषेतला जो गोडवा असतो तो ह्या इंग्रजी भाषेत दिसत नाही.

                       

               दोन व्यक्ति जेव्हा भेटतात, बोलतात तेव्हा ते मराठी भाषेतच बोलतात, आणि ते दोन व्यक्ति बरेच दिवसानंतर किंवा वर्षानंतर भेटतात तेव्हा सुरुवाती ला हाच प्रश्न एकमेकांना विचारतात कि कसा आहेस रे बाबा तु! आणि ह्याच मराठी वाक्यात गोडवा दिसून येते. आणि तेच इंग्रजी भाषेत विचारुन बघा " How are you " ह्यातला तुम्हालाच फरक दिसुन येईल. म्हणूनच कुसुमाग्रज ह्यांनी असे म्हटले कि , 
                " परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी। माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपु नका।। भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे। गुलाम भाषिक होऊनि अपुल्या प्रगतिचे शिर कापु नका ॥ "

तर आज मराठी राजभाषा दिन ह्या दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा.🤝💐💐
 
                                           _ एकता चौधरी.

Thursday 24 February 2022

राजमुद्रा

 || छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे पुत्र म्हणजेच शिवपुत्र ह्यांची राजमुद्रा ||

१) छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा -

"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता ।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।"

अर्थ :- प्रतीपदेच्या चंद्रा प्रमाणे वाढत जाणारी व विश्वात सर्वानी वंदलेली शहाजी पुत्र शिवाजी यांची ही मुद्रा सर्वांच्या कल्याणासाठी विलसत आहे.

राज्याभिषेकाच्या नंतर एक नवीन मुद्रा देखील बनवली गेली होती. ती पुढीलप्रमाणे, 

श्री महादेव

श्री तुळजाभवानी

शिवनृप रूपेणोर्वीमय

तीर्णोयःस्वयं प्रभु र्विष्णूः

एषा तदिय मुद्रा

भुबळ्यस्याभयप्रदा जयति।।

अर्थ :- श्री शिवरायांच्या रूपामध्ये पृथ्वीवर अवतीर्ण झालेले हे स्वतः श्री विष्णुच आहेत. ही त्यांची मुद्रा संपूर्ण भूतलाला अभय देणारी आहे. तिचा जयजयकार असो!



२)  छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा -
  
" श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
  यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।। "

अर्थ :-  शिवपुत्र श्री शंभु राजे यांची राजमुद्रा सूर्याच्या तेजाप्रमाणे आकाशी शोभते आहे लोकांच्या कल्याणाकरिता तिचा अंमल सर्वत्र गाजणारा आहे त्यासाठी ही मुद्रा सदैव प्रकाशमान आहे.


३)  छत्रपती राजाराम महाराजांची राजमुद्रा -
यांच्या देखील दोन राजमुद्रा आहेत, 

 " प्रति:पात चंन्द्रलेखीव वर्धीष्णू विश्ववंदिता |
        शिवासुनोरीयंमुद्रा राजारामस्य विराज्यते || "

अर्थ :- प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे कलेकलेने वाढत जाणारी उत्तरोत्तर पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे परिपूर्ण होऊन सकळ विश्वाला वंद्य होणारी शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांची ही मुद्रा लोककल्याणार्थ विराजत आहे.


" श्री धर्म प्रद्योतिता शेषवर्ण दाशरथेरिव |

राजारामस्य मुद्रेय विश्ववंद्या विराजते ||

अर्थ :- धर्माला उत्तेजन किंवा प्रोत्साहन देणारी दशरथ पुत्र श्रीरामाप्रमाणे संपूर्ण विश्वाला वंदनीय असणारी राजाराम छत्रपतींची ही मुद्रा शोभत आहे.

 
   ( Google वर आढळून आलेल्या राजमुद्रा मी तश्याच लिहून काढल्यात..... ) 

Wednesday 23 February 2022

शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज

शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज " २४ फेब्रुवारी १६७० "
   
                  आज24 फेब्रुवारी "छत्रपती राजाराम महाराज" ह्यांनची जयंती. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र आणि मराठेशाहीतील तिसरे छत्रपती. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १६७० रोजी शिवपत्नी सोयराबाईंच्या पोटी राजगडावर झाला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रसंगामुळे संपूर्ण मराठी स्वराज्य हादरले. कठीण प्रसंगी सारासार बुद्धीने विचार करू शकतील असे काही लोक शिवाजी महाराजांनी अगोदरच मिळवून ठेवले होते. यामध्ये रामचंद्रपंत अमात्य, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, शंकराजी नारायण, प्रल्हाद निराजी इत्यादींचा समावेश होता. या सर्व मंडळींनी राजाराम महाराजांचा राज्याभिषेक केला. संभाजी महाराजांच्या मृत्यु वेळेस राजाराम महाराज 
यांचे वय १९ वर्षाचे होते. 
राजाराम राजे ह्यांचे चार लग्न/विवाह झाले . त्यातील पहिलं लग्न १५ मार्च १६८० रोजी जानकीबाई ह्यांनच्याशी झालं.
काही वर्षानंतर जानकीबाई ह्यांचे निधन झाले. आणि त्यानंतर दुसरे लग्न ताराबाई मोहिते ह्यांनच्याशी झालं. त्यानंतर महाराजांचे तिसर लग्न राजसबाई ह्यांनच्याशी झालं.व त्यानंतर आणखी एक लग्न अंबिकाबाई ह्यांनच्याशी झालं. 
      
                  सन १६७९ ते १७००पर्यंत महाराष्टावर सतत स्वाऱ्या होत होत्या, दुष्काळ, जाळपोळ यामुळे महाराष्ट्र खचून गेला होता. राज्याची तिजोरी नाही, राजा परागंदा, पुरेशी फौज नाही अशा काळात वतनदाऱ्या बहाल करण्याशिवाय दुसरा पर्याय राजाराम महाराजांसमोर नव्हता असे वाटते. पण नंतर याचे भंयकर दुष्परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागले.राजाराम हे मुळातच शांत स्वभावाचे राजे होते. त्यांनी राज्यकारभाराची घडी व्यवस्थित घालण्याचा प्रयत्न केले व त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले.सततची धावपळ, सोबत वाईट प्रकृती व यामुळे राजाराम महाराज लवकरच वारले. परंतु त्या आधी त्यांनी शिव चरित्र लिहुन घेतले होते. राजाराम महाराज ह्यांनच्या दोन राजमुद्रा होत्या.
 १)         " प्रति:पात चंन्द्रलेखीव वर्धीष्णू विश्ववंदिता |
           शिवासुनोरीयंमुद्रा राजारामस्य विराज्यते || "
 
२)          " धर्मप्रद्योदिताशेषवर्णा
दाशराथेरीव | राजारामस्य मुद्रेय विश्ववंद्या विराजते || "

                     
                                  _ एकता चौधरी.

             

Tuesday 22 February 2022

चहाबाज

 चहाबाज

चहाची वेडी मी, 
पिल्याशिवाय रहावत नाही, 
तलफ तुझी ही , 
सकाळ झाल्या शिवाय मिळत नाही , 

हे व्यसन म्हणावं कि आवड, 
हे ही तुझ्या नादात उमजत नाही, 
दोन घोट तुझे पिल्याशिवाय 
सकाळ माझी होत नाही, 

गरम उकळती वाफ तुझी
भासल्या शिवाय, आणि 
तो सुगंध तुझा घेतल्याशिवाय, 
दिवस माझा जात नाही.

                _ekta chaudhari

Monday 21 February 2022

शिर आहे पण प्राण नाही.....❗

जीव आहे पण जिवंतपणाची जाणिव चं नाही,
असं पण म्हणता येईल की,
  शिर आहे पण प्राण नाही.....❗

                  शिर आहे पण प्राण नाही.... . 


                     जन्म म्हणजे काय? हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडला असेल, " एखादा जीव जन्मला तो मरेपर्यतचा जो प्रवास असतो, त्याला आपण जन्म/जिवन म्हणतो" जीवनाच्या प्रवासात माणूस एकटाच येतो आणि एकटाच जातो. प्रत्येक मनुष्याच्या जिवनात अनेक प्रकारचे संकट येतात आणि मनूष्य प्रत्येक संकटांवर मात करून समोर जातो.तर, काही मनूष्यांना संकटांवर मात करता येत नाही म्हणून ते आत्महत्येचा मार्ग स्विकारतो.आपण आपले जिवन स्वत:साठी नव्हे तर, इतरांनसाठी जगायला हवे.

जो मनुष्य आत्महत्येचा मार्ग स्विकारून आत्महत्या करतो, तो मेल्यावर त्याला काहीच त्रास होत नाही.तर, त्याचे जे आपले लोक असतात त्यांना तो त्रास देऊन जातो.

कसं आहे नां, जन्म आहे, जिवन आहे पण जिवंतपणाची जाणिव च नाही. आयुष्य किती दिवसाचे असते हे कुणालाच माहिती नसते, आजचे अस्तित्व उद्या नसते.

उद्या काय होईल हे कुणालाच माहिती नसते.आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही, आणि दुखा:पासुन आजपर्यंत कोणीही वंचित राहलेल नाही.

                        सध्याच्या परिस्थितित असं झाल आहे की, नाकाला लाभणारा सुगंध आहे पण तो ही घेता येत नाही. माणसाच्या गर्दीत हवा असलेला सहवासही नाही, नाती आहे.तस सगळ आहे, पण त्या असण्याला अर्थ राहला नाही.सगळ काही असुन सुध्दा काहीतरी हरविल्याची हूरहुरता मात्र नक्की आहे. जन्म आहे पण जिवंतपणाची जाणिव च नाही. 

आज असं झाल आहे, कोणी जगेल, कोणी मरेल याचा काही भरवसाच नाही, आनंद हा आता एक प्रकारचा आभासच म्हणून राहलेला आहे. प्रत्येक मनुष्य सुखा:च्या

मागे धावत असतो. सहजा-सहजी सुख प्राप्त होत नाही.

सुख हे क्षणभंगुर असते.आपल आयुष्य हसत खेळत जगायचं असते. गरीबांनाही दुख: असतात, आणि श्रीमंतानाही दुख: असतात.असं नाही की, तो श्रीमंत आहे त्याला दुख: आहेचं नाही, जरी तो श्रीमंत असला. त्याच्याकडे भरभक्कम संपत्ति असली तरी त्याला सर्व सुख मिळेलच असे नाही. दुखा:पासुन कोणीही वंचित नाही.

                         माणसाचं आयुष्य त्याच्या कर्मावर अवलंबून असते.त्यांनी जेवढे चांगले कर्म केले त्याचं त्याला नक्कीच फळ मिळतं आणि आयुष्यात किती ही चांगली कर्म करा पण कौतुक मात्र स्मशानातच होत. माणसाला जीवन हे एकदाच मिळालेल असतं. त्या जीवनाच सोन कसं  

करता येईल हे त्यानेच ठरवायचं असतं. कोणी सुखा:च्या तोंडातून पाय ओढले म्हणून परतायचं नसतं. अपयश आले म्हणून प्रयत्न थांबवायचे नसते.म्हणूनच म्हटलेल आहे "प्रयत्नांती परमेश्वर" म्हणूनच  मित्रांनो, हसत- खेळत आनंदी जिवन जगा, कुठल्याही परिस्थितिवर मात करायला शिका, कर्म चांगले कराल तर नक्कीच त्याचं तुम्हाला फळ मिळेल. कुठल्याही गोष्टिचा गर्व करू नका.शेवटी गर्वाचे घर  खालीच असते.


                         

                      

                      

Sunday 20 February 2022

माझ्या प्रश्नांची उत्तरे...

माझ्या प्रश्नांची उत्तरे... 

सांग रे दिव्या, अंधारात जळुन तुला
तुझी सावली दिसते का...? 
सावली दिसत नाही म्हणुन , 
याची खंत तुला वाटते का...? 

सांग रे फुलपाखरा, तुला तुझे
शोभित रंग दिसते का...? 
रंग दिसत नाही म्हणुन , 
याची खंत तुला वाटते का...? 

सांग रे फुला, तुला तुझा सुगंध 
येतो का...? 
सुगंध येत  नाही म्हणुन , 
याची खंत तुला वाटते का...? 

सांग रे  सुर्या, तुझेच तुला
चटके लागतात का...? 
चटके लागत नाही म्हणुन , 
याची खंत तुला वाटते का...?

सगळे सोबत मिळुन माझ्या
प्रश्नांची उत्तरे देऊ शकाल का...? 
नाही देता येत म्हणून शांत राहू शकाल का...? 
                    
                          _ एकता चौधरी

आई

 आई

नसे तिच्या मायेला अंत
करे मायेने संगोपन, 
धरुनी बोटाला, शिकवी चालायला
म्हणुनी  काऊ-चिऊचा, 
घास भरवी मऊ-मऊ भाताचा

दफ्तर छोटस , डब्बा पोळी-भाजीचा
धरुनी  बोटआईचे,
 मी जाई रोज शाळेला 
सायंकाळी येऊनी मी शाळेतुन, 
खाऊनी गरम ,जाई रोज खेळायला

घेई रोज अभ्यास माझा
गुण चांगले मिळवुनी, 
देई शाब्बासकी मला

पुरवी हट्ट माझे
जास्त जिद्दी झाली की, 
देई वरतुनी धपाटे
घेऊनी जवळ पुसे अश्रु माझे
हात मायेचा फिरवुनी पाठीशी, 
शांत करी मला

चिमुकली मी आज झाली मोठी
एके दिवशी उडुनी जाई परक्या घरी, 
तेव्हा  येई आठवण तुझी......

                  _EktachUdhari

INTERNATIONAL MOTHER LANGUAGE DAY

 आज 21 फ्रेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातॄभाषा दिवस म्हणजेच " International mother language day " तर मातृभाषा म्हणजे अशी भाषा ज्याद्वारे राष्ट्रातील लोक त्यांच्या कल्पना, विचार, आणि भावना स्पष्टपणे व्यक्त करतात भाषा ही केवळ संवाद साधण्याचा एक मार्ग आहे. भाषा आणि विशेषतः आपली मातृभाषा ही आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. काही लोकांना असे वाटते की आपण जगाकडे कसे पाहतो ,ते आपली भाषा कशी बदलू शकते. हे विचार बरेच लोक करतांनी दिसुन येते.
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्याची कल्पना बांगलादेशच्या पुढाकाराने घेतली होती. हे 1999 च्या युनेस्कोच्या जनरल कॉन्फरन्समध्ये मंजूर करण्यात आले होते आणि 2000 पासून ते जगभरात पाळले जात आहे.
 जगात सुमारे 6,500 भाषा आहेत, परंतु दर दोन आठवड्यांनी एक भाषा नाहीशी होते.आणि मरते हे तुम्हाला माहिती आहे का? 21 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा जगातील सर्व भाषांना साजरे करण्याचा आणि त्यांचे संरक्षण करण्याचा दिवस आहे.शाश्वत समाजांसाठी सांस्कृतिक आणि भाषिक विविधतेच्या महत्त्वावर युनेस्कोचा विश्वास आहे. इतरांबद्दल सहिष्णुता आणि आदर वाढवणार्‍या संस्कृती आणि भाषांमधील फरक टिकवून ठेवण्यासाठी ते शांततेसाठीच्या त्याच्या आदेशानुसार कार्य करते.
अधिकाधिक भाषा नाहीशा झाल्यामुळे धोका वाढत आहे. जागतिक स्तरावर 40 टक्के लोकसंख्येला ते बोलतात किंवा समजतात अशा भाषेत शिक्षण मिळत नाही. असे असले तरी, मातृभाषेवर आधारित बहुभाषिक शिक्षणामध्ये त्याचे महत्त्व, विशेषत: लवकर शालेय शिक्षण आणि सार्वजनिक जीवनात त्याच्या विकासासाठी अधिक वचनबद्धतेच्या वाढत्या आकलनासह प्रगती केली जात आहे.
बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक समाज त्यांच्या भाषांमधून अस्तित्वात आहेत जे पारंपारिक ज्ञान आणि संस्कृतींचे शाश्वत मार्गाने प्रसार आणि जतन करतात. हा उत्सव म्हणजे आपल्या जीवनात भाषांची भूमिका आणि जगात आणि आपल्या स्थानिक समुदायांमध्ये भाषिक विविधता जपण्याचे महत्त्व यावर विचार करण्याची संधी आहे. प्रत्येक भाषा ही संस्कृतीची, विचार करण्याची, जगण्याची आणि ज्ञान प्रसारित करण्याची एक खिडकी असते.सहिष्णुता आणि आदर वाढवण्याच्या दृष्टीकोनातून मुलाच्या जीवनातील भाषेच्या महत्त्वावर चर्चा  करने हे एक आदर्श च होय. 
अनेक भाषा शिकण्याचा आणि वापरण्याचा अनुभव मुलाचे जीवन समृद्ध करतो आणि बहुभाषिक अनुभवाशी संबंधित भावना आणि दिनचर्या यावर विचार करणे चांगले.भाषेचा उपयोग विविधतेची जाणीव वाढवण्यासाठी एक साधन म्हणून केला जाऊ शकतो.
                 " WISH YOU A HAPPY INTERNATIONAL                MOTHER  LANGUAGE DAY "

ईवली ईवली चिमणी

 ईवली ईवली चिमणी

ईवली ईवली चिमणी
बांधती कशी घरटी
चोचीं ने पिल्लांना 
भरविते कशी..? 

अगं अगं चिमणी
धाव घे घरट्या कड़ी
ईवलीशी पिल्ल 
पाही वाट तुझी
 
ईवलीशी चोच तुझी
आणीते चारा पाणी कशी
ईवली ईवली चिमणी
आकाशात उडुन घरट्याची वाट 
शोधते कशी..? 

ईवल्या ईवल्या चोचीने
बनविलेले घरटे, 
पाहु मी कशी
चिऊताई चिऊताई तुझ्याबरोबर 
घरटे बघायला येऊ मी कशी...? 

Saturday 19 February 2022

world day of social justice

             आज २० फ्रेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिन (world day of social justice) हा दिवस सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा आणि लिंग, वंश, असमानता, धार्मिक भेदभाव इत्यादींसंबंधीचे अडथळे दूर करण्याचा दिवस आहे. तो जगभरातील सामाजिक अन्यायावर प्रकाश टाकतो आणि त्यावरील उपाय आणि सुधारणांकडे लक्ष देतो. आपण या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करू शकत नाही की सामाजिक अन्याय हे राष्ट्रांमध्ये आणि राष्ट्रांमध्ये शांततापूर्ण आणि समृद्ध सहअस्तित्वाचे एक महत्त्वाचे तत्व आहे. 
                वय, वंश, वंश, धर्म, संस्कृती किंवा अपंगत्व इत्यादींबद्दल लोकांना भेडसावणारे अडथळे दूर करण्यासाठी सामाजिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे.
(world day of social justice) जागतिक सामाजिक न्याय दिनाचा उद्देश, कर्तव्य " सामाजिक न्याय मिळवण्यासाठी असमानता अंतर बंद करणे " हे आहे. 40% पेक्षा कमी लोकांकडे चांगल्या दर्जाच्या नोकऱ्या आणि उत्तम प्रवेश आहे. त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि अधिक एकसंध आणि न्याय्य समाजात योगदान देण्यासाठी नोकऱ्या. हिंसक संघर्ष रोखणे आणि संघर्षानंतरच्या आव्हानांना सामोरे जाणे महत्त्वाचे आहे.
                  जागतिक सामाजिक न्याय दिन हा जागतिक साजरा आहे आणि सार्वजनिक सुट्टी नाही. 1995 मध्ये, कोपनहेगन, डेन्मार्क येथे सामाजिक विकासासाठी जागतिक शिखर परिषद आयोजित करण्यात आली आणि त्याचा परिणाम कोपनहेगन घोषणा आणि कृती कार्यक्रमात झाला. शिखर परिषदेत 100 हून अधिक राजकीय नेत्यांनी गरिबी आणि पूर्ण रोजगाराविरुद्ध लढण्याचे वचन दिले, तसेच ते स्थिर, सुरक्षित समाजासाठी काम करतील. विकास आराखड्यांमध्ये लोकांना केंद्रस्थानी ठेवण्याची गरज असल्याचेही ठरले
                 26 नोव्हेंबर 2007 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने 20 फेब्रुवारी हा वार्षिक जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणून घोषित केला. 2009 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला. जागतिक शिखर परिषदेनुसार, सामाजिक विकासाचे उद्दिष्ट सामाजिक न्याय, एकता, सौहार्द आणि देशांतर्गत आणि समानता. सामाजिक न्याय, समता आणि समता ही सर्व समाजांची मूलभूत मूल्ये आहेत यात शंका नाही. राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक न्यायाचा प्रसार करण्यासाठी सरकारने 'सर्वांसाठी एक समाज' साध्य करण्यासाठी एक आराखडा तयार करणे आवश्यक आहे. त्यांनी नोकरी शोधणार्‍यांसाठी समान संधी, उत्पन्नाचे समान वितरण आणि समानता आणि समानतेद्वारे संसाधनांमध्ये अधिक प्रवेश करण्याचे वचन दिले. सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याच्या उद्देशाने सामाजिक न्यायाचा प्रचार करणे आणि सामाजिकदृष्ट्या एकात्मिक समाज बनवण्यासाठी गरिबी, लिंग आणि शारीरिक भेदभाव, निरक्षरता, धार्मिक भेदभाव इत्यादी दूर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध समुदायांना एकत्र आणणे या उद्देशाने हा उत्सव साजरा केला जातो. .

Friday 18 February 2022

रयतेचा राजा

रयतेचा राजा

शिवनेरी किल्लावर सुर्य उगवला
भवानी मातेचा लेक जन्मला, 
मराठ्यांचा राजा होता 
आई जिजाऊंचा पुत्र होता ||

                 गोर-गरीबांचा साथी होता
                 मुघलांचा तो बाप होता, 
                 गर्व जातिचा नव्हता
                 अभिमान या मातीचा होता||

निधड्या छातीचा होता
दनकट मनाचा होता, 
तो मर्द मराठ्यांचा वाघ होता
असा आमचा रयतेचा राजा शिवबा होता||

||जाणता राजा||

 ||जाणता राजा||
     
             आज १९ फ्रेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजेच थोडक्यात म्हटलेच तर,' शिवजयंती ' हा संपूर्ण महाराष्ट्रातील प्रसिद्ध सण. १९ फ्रेब्रुवारी म्हणजेच एक संपूर्ण भारतातील उगवत्या सोन्याचा दिवस. 
१९ फ्रेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर माँ साहेब जिजाआईनं च्या पोटी सिंहाचा जन्म झाला. आणि तो सिंह म्हणजेच, श्रीमान योगी, लोक-कल्याणकरी राजे, जाणते राजे, छत्रपती शिवाजी राजे भोसले.
आज त्यांची जयंती. शिवाजी महाराजांनी आपल्या जनतेवर जिवापाड प्रेम केले. स्वराज्यासाठी लोकांच्या हितासाठी म्हणजेच, आपल्या हितासाठी लढले, व स्वताचे राज्य निर्माण केले. ते होते म्हणून आज आपण आहोत....! 
व भगव्या झेंड्याची शान त्यांच्या पासूनच आली आहे.
म्हणतात नं ' भगव्या झेंड्याची शान आणि धमक ' ही आज महाराजांन मुळेच टिकली आहे.
                                   छत्रपती शिवाजी महाराज पिढ्यानपिढ्या भारत देशातील प्रत्येकांनसाठी प्रेरणास्रोत राहीले आहेत. शहाजी राजांचे, म्हणजेच त्यांच्या वडीलांचे च स्वप्न हिंदवी स्वराज्य स्थापण करायचे, हे स्वप्न शिवबा राजे ह्यांनी पूर्ण केले. आणि त्याचबरोबर आपल्या स्वराज्याची राजमुद्रा ही तयार केली. त्या काळी शिवाजी महाराजां ची राजमुद्रा घालण्याचा कोणालाही अधिकार नव्हता.व महाराजांना सुध्दा ती राजमुद्रा घालायचा अधिकार नव्हता.
शहाजी राजांचे असे म्हणणे होते की, ज्यांची राजमुद्रा न चुकता पाठ असेल त्यांनीच तीचा वापर करावां, आणि आज संपूर्ण जगभरात ज्यांच्या- त्यांच्या हातात, बोटात, गळ्यात ती राजमुद्रा आढळून येत आहे.
                "प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता ।।
               शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।"
अशाप्रकारे ती राजमुद्रा होती. प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमकेल. असा त्याचा अर्थ.
                                    मित्रांनो, जशी जशी शिवजयंती चा दिवस येतो तसं-तसं आपण त्या दिवसाची धामधूमीत तयारी करतो, संपूर्ण महाराष्ट्रात आजच्या दिवसाचा जल्लोश दिसतो. आणि त्याच बरोबर आपण त्या दिवशी what's app ची profile, status पण महाराजांचे च ठेवतो. आणि नेमकं ह्याच दिवशी म्हणजे १९ फ्रेब्रुवारी च्या दिवशी आपल्याला महाराजांचे संस्कार, गुण आत्मसात करतो. तर असं का...? की शिवजयंती आहे म्हणून! 
मित्रांनो, स्वराज्य हा फक्त भूगोल नव्हता तर, आधी ते राज्य महाराजांनी रयतेच्या मनात स्थापन केलं.
मराठी मूल जाणतं झालं की, महाराजांचा फोटो ओळखला लागतं तर का? आज मराठी माणसाच्या मना-मनात महाराज रूजलेले आहेत.पण त्यांची शिकवण आज लोकं विसरत चाललेले आहेत. सत्याचा मार्ग विसरून चूकी च्या मार्गाने चालत आहे. असंच आजकाल जगभरात आढळून येते. आणि काय तर, आजकाल चे पोरं म्हणतात " सांग ओरडून जगाला, भित नाही कोणाच्या बापाला! " तर असो.... 
मित्रांनो, आज शिवजयंती तर सर्वांना शिव शुभेच्छा! 

                          || जय शिवराय||

Wednesday 16 February 2022

दु:ख सांगावे कुणाला!

शेतकऱ्याचे छायाचित्र/ Farmer img गुगल वर सर्चिंग करीत असतांना ही ह्रदयस्पर्शी पोस्ट आढळून आली. पोस्ट कोणी तयार केले हे माहीती नाही.पण मात्र नक्किचं ज्यांनी ही पोस्ट तयार केली ह्या पोस्ट मागे खुप मोठ्ठ कटू सत्य सांगून गेलं/ पटवून गेले.
                      सध्याच्या परीस्थितीत असंच चालू आहे, आज शिक्षण पण ऑनलाइन पध्दतीने सुरू आहे. आज मोबाईल शिवाय काही पर्याय नाही. आजकाल ऑनलाइन शिक्षण झाल्यामुळे असे कित्येक लोक आहे कि ज्यांची परिस्थिति बिकट आहे. त्यांच्याकडे मोबाईल नसुन सुध्दा दुसऱ्याचा मोबाईल हाताळून क्लासेस करत आहे,परंतु मोबाईल घेण्याची त्यांच्याकडे सोय नाही इवढे ऑनलाइन शिक्षण आज ह्यांनच्यापुढे महत्वपूर्ण झालेले दिसुन येत आहे. आणि काय तर प्रत्येक महिन्याला unlimited recharge, तर असो आज जी परीस्थितीत दिसुन येत आहे ती corona virus ह्या आजारांनमुळे.
                इंटरनेट वर दिसुन आलेल्या छायाचित्रा मध्ये एक गरीब शेतकरी बाप आपल्या लेकाला ( मुलाला) सांगतांनी दिसुन येत आहे की, लेकरा आताच दुबार पेरणी झाली ऑनलाइन शिक्षणाले मोबाईल कुठून आनुन देवु? हे दु:ख तो स्वत:हा च्या मुलाला सांगतो आहे. आणि हे एका शेतकरी बापाच दु:ख आज मी ह्या लेखद्वारे तुमच्या समोर घेऊन आली आहे.
मित्रांनो, आजकाल शिक्षण पण खुप  महत्वाचे झाले आहे. पण अशा कित्येक शेतकरी बापांनकडे शिक्षणासाठी मोबाईल आणि सोबतच unlimited recharge कुठून येणार, आणि वरुन त्याचसोबत शिक्षणाचा खर्च, ह्याच कारणामुळे कित्येक मुलांनी शिक्षण सोडले आहे आणि आज ते मुलं बाल मजदूरी करतांनी आढळून येत आहे.
लॉकडाऊनमुळे आज शेतात मजूर कामाला येत नाही. त्यामुळे माल काढता येत नाही. काढला तर तो विक्रीसाठी बाजारात नेण्यासाठी वाहन नाही आणि नेलेच बाजारात तर विकल्या जाईल हे सांगता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांना हा माल आपल्या डोळ्यांदेखत शेतात तसाच सोडून द्यावा लागत आहे. ग्रामीण भागातील बळिराजाची आज काय अवस्था झाली आहे.
ह्याच समस्या मुळे आज "धरीत्रीच्या कुशीमधीं तशीच बीयबियानं निजलीं आहे " 

कहानी शेतकऱ्यांची

कहानी शेतकऱ्यांची

 शेतात राब-राब राबुनी
काही न लागे त्याच्या हाती 
नशिबी त्याच्या माती-गोटी
तरीबी त्याच्या हसु ओठी ||

रुसे पाऊस कधी
फुकट जाई पेरणी
होई तयार पिक कधी 
कोसळत्या पावसात, 
 न्हाऊनी जाई कधी ||

कर्ज घेऊनी , भागवी गरजा 
कर्जबाजारी होऊनी, 
कशी कर्ज फेडणार 
होऊनी दुष्काळग्रस्त 
संकट येई मोठे ||

स्विकारुन मार्ग आत्महत्येचा 
ठरती कर्जबळी 
अशी शेतकऱ्याची कहानी 
ऐकुनी भरुनी येई डोळी ||

Tuesday 15 February 2022

जुन्या आठवणी

न कळताच वर्ष निघुन गेले, वयाने ही मोठे होत गेलो. भिंतीवर लावलेल्या फोटो कडे अलगदच लक्ष गेले. काही वेळ त्या फोटो कडेच बघत राहीले. त्या भिंतीवर लावलेल्या फोटो मध्ये जुन्या आठवणी दळलेल्या होत्या, अलगतच डोळे पानावून गेले.
बघता-बघता वर्ष निघुन गेलेत आणि त्यांच्या सोबत  च बालपन ही हरवून गेलं. फक्त आठवणी ओघळत राहिल्या, जुन्या गोड आठवणी नी मन भरले. फक्त बदलले नाही ते कॅलेंडर पानं तिच होती, तारखा पण त्याच होत्या, आणि वार सुध्दा तेच होते.बदलत गेलं फक्त साल.
मी फक्त त्या भिंतीवर लावलेल्या फोटो मध्ये जुन्या आठवणी शोधत होती. तो वेळ जुन्या आठवणींन मध्ये हरवून गेला.
जुन्या आठवणी आठवल्यात की, मन हळवं होत. हसुही येतं, हसता-हसता डोळयांन मधुन अश्रु ही येतं. जुन्या आठवणी आठवून आता असं वाटतं की बालपन चं चांगल होतं.

" हाक मारूनी मन आवाज देते   बालपना, कुठे तु हरवून गेलास, 
फक्त आठवणीत च तु जिवंत राहुनी
गेलास....... "

त्या बालपनाला मन हाक मारुन आवाज देत आहे. तरी ही ते बालपन आठवणी मध्येच गुंतलेल आहे.

😇😇😇

Monday 14 February 2022

अंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन

अंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन / International childhood cancer day( ICCD). 

                    15 फेब्रुवारी International childhood cancer day( ICCD) म्हणजेच अंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन. कर्करोग हा एक जीवघेणा आजार आहे, कोणत्याही व्यक्ति ला, कधीही त्यांचे वय विचारात न घेता प्रभावित करू शकतो. हे एखाद्या व्यक्ति च्या सुरळीत कामकाजात अडथळा आणू शकतो, मग तो तरूण प्रौढ़ असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो.
लहान मुले ही या आजारा पासून वाचलेली नाहीत; खरं तर, कर्करोग हे मुलांनमध्ये मॄत्यूचे प्रमुख कारण आहे.
                        बालपण कर्करोग दिवस म्हणजे काय?, 
बालपण कर्करोग दिवस कधी आहे?, तर मित्रांनो, बालपणातील कर्करोगांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी, बालपणातील कर्करोगांविषयी जागरूकता वाढविण्यासाठी  International childhood cancer day (ICCD) १५ फेब्रुवारी ला साजरा करण्यासाठी घोषित केला आहे.
आज १५ फेब्रुवारी, अंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन. दरवर्षी १५ फेब्रुवारी रोजी बालपणातील कर्करोगांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि कर्करोगाने पिडित मुले व त्यांच्या कुटूंबीयांना मदत करण्यासाठी पाळला जातो.
                        महाराष्ट्रात बालपण कर्करोगाचे प्रमाण ४,०००-६३०० इतके आहे. कर्करोग लहान मुलांनमध्ये जास्त होतो, मुलांनमध्ये कर्करोग आढळने हे प्रौढ़ व्यक्ति च्या शरीरात आढळलेल्या कर्करोगापेक्षा वेगळा असतो.
जागतीक आरोग्य संघटने नुसार बालपणातील कर्करोगाच्यासाठी सर्वात महत्वाचा घटक. ग्रस्त असलेल्या मुलांच्या गरजा भागविण्यासाठी एक राष्ट्रीय योजना आहे. जेव्हा एखाद्या मुलाला कर्करोग झाल्याचे आढळून येते, तेव्हा त्याचा परिणाम कुटूंबातील प्रत्येकांवर होतो. तेव्हा त्यांनी खंबीर होऊन या परिस्थितिला एकत्रित पणे लढा देण्याची गरज त्यांना आहे.
               " Supporting the fighters admiring the survivors honoring the taken and never ever giving up hope".

आयुष्याचं साधन एक पुस्तक.....

आयुष्याचं साधन एक पुस्तक..... जिवनातला दुसरा आरसा म्हणजे पुस्तक आयुष्याच्या प्रवासात,  जग पालटुन टाकणार साधन म्हणजे पुस्तक, आपल्यकडे कसली तक...