Thursday 24 February 2022

राजमुद्रा

 || छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे पुत्र म्हणजेच शिवपुत्र ह्यांची राजमुद्रा ||

१) छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा -

"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता ।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।"

अर्थ :- प्रतीपदेच्या चंद्रा प्रमाणे वाढत जाणारी व विश्वात सर्वानी वंदलेली शहाजी पुत्र शिवाजी यांची ही मुद्रा सर्वांच्या कल्याणासाठी विलसत आहे.

राज्याभिषेकाच्या नंतर एक नवीन मुद्रा देखील बनवली गेली होती. ती पुढीलप्रमाणे, 

श्री महादेव

श्री तुळजाभवानी

शिवनृप रूपेणोर्वीमय

तीर्णोयःस्वयं प्रभु र्विष्णूः

एषा तदिय मुद्रा

भुबळ्यस्याभयप्रदा जयति।।

अर्थ :- श्री शिवरायांच्या रूपामध्ये पृथ्वीवर अवतीर्ण झालेले हे स्वतः श्री विष्णुच आहेत. ही त्यांची मुद्रा संपूर्ण भूतलाला अभय देणारी आहे. तिचा जयजयकार असो!



२)  छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा -
  
" श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
  यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।। "

अर्थ :-  शिवपुत्र श्री शंभु राजे यांची राजमुद्रा सूर्याच्या तेजाप्रमाणे आकाशी शोभते आहे लोकांच्या कल्याणाकरिता तिचा अंमल सर्वत्र गाजणारा आहे त्यासाठी ही मुद्रा सदैव प्रकाशमान आहे.


३)  छत्रपती राजाराम महाराजांची राजमुद्रा -
यांच्या देखील दोन राजमुद्रा आहेत, 

 " प्रति:पात चंन्द्रलेखीव वर्धीष्णू विश्ववंदिता |
        शिवासुनोरीयंमुद्रा राजारामस्य विराज्यते || "

अर्थ :- प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे कलेकलेने वाढत जाणारी उत्तरोत्तर पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे परिपूर्ण होऊन सकळ विश्वाला वंद्य होणारी शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांची ही मुद्रा लोककल्याणार्थ विराजत आहे.


" श्री धर्म प्रद्योतिता शेषवर्ण दाशरथेरिव |

राजारामस्य मुद्रेय विश्ववंद्या विराजते ||

अर्थ :- धर्माला उत्तेजन किंवा प्रोत्साहन देणारी दशरथ पुत्र श्रीरामाप्रमाणे संपूर्ण विश्वाला वंदनीय असणारी राजाराम छत्रपतींची ही मुद्रा शोभत आहे.

 
   ( Google वर आढळून आलेल्या राजमुद्रा मी तश्याच लिहून काढल्यात..... ) 

No comments:

Post a Comment

आयुष्याचं साधन एक पुस्तक.....

आयुष्याचं साधन एक पुस्तक..... जिवनातला दुसरा आरसा म्हणजे पुस्तक आयुष्याच्या प्रवासात,  जग पालटुन टाकणार साधन म्हणजे पुस्तक, आपल्यकडे कसली तक...