Wednesday 16 February 2022

दु:ख सांगावे कुणाला!

शेतकऱ्याचे छायाचित्र/ Farmer img गुगल वर सर्चिंग करीत असतांना ही ह्रदयस्पर्शी पोस्ट आढळून आली. पोस्ट कोणी तयार केले हे माहीती नाही.पण मात्र नक्किचं ज्यांनी ही पोस्ट तयार केली ह्या पोस्ट मागे खुप मोठ्ठ कटू सत्य सांगून गेलं/ पटवून गेले.
                      सध्याच्या परीस्थितीत असंच चालू आहे, आज शिक्षण पण ऑनलाइन पध्दतीने सुरू आहे. आज मोबाईल शिवाय काही पर्याय नाही. आजकाल ऑनलाइन शिक्षण झाल्यामुळे असे कित्येक लोक आहे कि ज्यांची परिस्थिति बिकट आहे. त्यांच्याकडे मोबाईल नसुन सुध्दा दुसऱ्याचा मोबाईल हाताळून क्लासेस करत आहे,परंतु मोबाईल घेण्याची त्यांच्याकडे सोय नाही इवढे ऑनलाइन शिक्षण आज ह्यांनच्यापुढे महत्वपूर्ण झालेले दिसुन येत आहे. आणि काय तर प्रत्येक महिन्याला unlimited recharge, तर असो आज जी परीस्थितीत दिसुन येत आहे ती corona virus ह्या आजारांनमुळे.
                इंटरनेट वर दिसुन आलेल्या छायाचित्रा मध्ये एक गरीब शेतकरी बाप आपल्या लेकाला ( मुलाला) सांगतांनी दिसुन येत आहे की, लेकरा आताच दुबार पेरणी झाली ऑनलाइन शिक्षणाले मोबाईल कुठून आनुन देवु? हे दु:ख तो स्वत:हा च्या मुलाला सांगतो आहे. आणि हे एका शेतकरी बापाच दु:ख आज मी ह्या लेखद्वारे तुमच्या समोर घेऊन आली आहे.
मित्रांनो, आजकाल शिक्षण पण खुप  महत्वाचे झाले आहे. पण अशा कित्येक शेतकरी बापांनकडे शिक्षणासाठी मोबाईल आणि सोबतच unlimited recharge कुठून येणार, आणि वरुन त्याचसोबत शिक्षणाचा खर्च, ह्याच कारणामुळे कित्येक मुलांनी शिक्षण सोडले आहे आणि आज ते मुलं बाल मजदूरी करतांनी आढळून येत आहे.
लॉकडाऊनमुळे आज शेतात मजूर कामाला येत नाही. त्यामुळे माल काढता येत नाही. काढला तर तो विक्रीसाठी बाजारात नेण्यासाठी वाहन नाही आणि नेलेच बाजारात तर विकल्या जाईल हे सांगता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांना हा माल आपल्या डोळ्यांदेखत शेतात तसाच सोडून द्यावा लागत आहे. ग्रामीण भागातील बळिराजाची आज काय अवस्था झाली आहे.
ह्याच समस्या मुळे आज "धरीत्रीच्या कुशीमधीं तशीच बीयबियानं निजलीं आहे " 

No comments:

Post a Comment

आयुष्याचं साधन एक पुस्तक.....

आयुष्याचं साधन एक पुस्तक..... जिवनातला दुसरा आरसा म्हणजे पुस्तक आयुष्याच्या प्रवासात,  जग पालटुन टाकणार साधन म्हणजे पुस्तक, आपल्यकडे कसली तक...