Friday 18 February 2022

||जाणता राजा||

 ||जाणता राजा||
     
             आज १९ फ्रेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजेच थोडक्यात म्हटलेच तर,' शिवजयंती ' हा संपूर्ण महाराष्ट्रातील प्रसिद्ध सण. १९ फ्रेब्रुवारी म्हणजेच एक संपूर्ण भारतातील उगवत्या सोन्याचा दिवस. 
१९ फ्रेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर माँ साहेब जिजाआईनं च्या पोटी सिंहाचा जन्म झाला. आणि तो सिंह म्हणजेच, श्रीमान योगी, लोक-कल्याणकरी राजे, जाणते राजे, छत्रपती शिवाजी राजे भोसले.
आज त्यांची जयंती. शिवाजी महाराजांनी आपल्या जनतेवर जिवापाड प्रेम केले. स्वराज्यासाठी लोकांच्या हितासाठी म्हणजेच, आपल्या हितासाठी लढले, व स्वताचे राज्य निर्माण केले. ते होते म्हणून आज आपण आहोत....! 
व भगव्या झेंड्याची शान त्यांच्या पासूनच आली आहे.
म्हणतात नं ' भगव्या झेंड्याची शान आणि धमक ' ही आज महाराजांन मुळेच टिकली आहे.
                                   छत्रपती शिवाजी महाराज पिढ्यानपिढ्या भारत देशातील प्रत्येकांनसाठी प्रेरणास्रोत राहीले आहेत. शहाजी राजांचे, म्हणजेच त्यांच्या वडीलांचे च स्वप्न हिंदवी स्वराज्य स्थापण करायचे, हे स्वप्न शिवबा राजे ह्यांनी पूर्ण केले. आणि त्याचबरोबर आपल्या स्वराज्याची राजमुद्रा ही तयार केली. त्या काळी शिवाजी महाराजां ची राजमुद्रा घालण्याचा कोणालाही अधिकार नव्हता.व महाराजांना सुध्दा ती राजमुद्रा घालायचा अधिकार नव्हता.
शहाजी राजांचे असे म्हणणे होते की, ज्यांची राजमुद्रा न चुकता पाठ असेल त्यांनीच तीचा वापर करावां, आणि आज संपूर्ण जगभरात ज्यांच्या- त्यांच्या हातात, बोटात, गळ्यात ती राजमुद्रा आढळून येत आहे.
                "प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता ।।
               शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।"
अशाप्रकारे ती राजमुद्रा होती. प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमकेल. असा त्याचा अर्थ.
                                    मित्रांनो, जशी जशी शिवजयंती चा दिवस येतो तसं-तसं आपण त्या दिवसाची धामधूमीत तयारी करतो, संपूर्ण महाराष्ट्रात आजच्या दिवसाचा जल्लोश दिसतो. आणि त्याच बरोबर आपण त्या दिवशी what's app ची profile, status पण महाराजांचे च ठेवतो. आणि नेमकं ह्याच दिवशी म्हणजे १९ फ्रेब्रुवारी च्या दिवशी आपल्याला महाराजांचे संस्कार, गुण आत्मसात करतो. तर असं का...? की शिवजयंती आहे म्हणून! 
मित्रांनो, स्वराज्य हा फक्त भूगोल नव्हता तर, आधी ते राज्य महाराजांनी रयतेच्या मनात स्थापन केलं.
मराठी मूल जाणतं झालं की, महाराजांचा फोटो ओळखला लागतं तर का? आज मराठी माणसाच्या मना-मनात महाराज रूजलेले आहेत.पण त्यांची शिकवण आज लोकं विसरत चाललेले आहेत. सत्याचा मार्ग विसरून चूकी च्या मार्गाने चालत आहे. असंच आजकाल जगभरात आढळून येते. आणि काय तर, आजकाल चे पोरं म्हणतात " सांग ओरडून जगाला, भित नाही कोणाच्या बापाला! " तर असो.... 
मित्रांनो, आज शिवजयंती तर सर्वांना शिव शुभेच्छा! 

                          || जय शिवराय||

No comments:

Post a Comment

आयुष्याचं साधन एक पुस्तक.....

आयुष्याचं साधन एक पुस्तक..... जिवनातला दुसरा आरसा म्हणजे पुस्तक आयुष्याच्या प्रवासात,  जग पालटुन टाकणार साधन म्हणजे पुस्तक, आपल्यकडे कसली तक...