Tuesday 22 March 2022

पाणि हे नैसर्गिक देणगी.......

  पाणि हे नैसर्गिक देणगी....... 

                         आज २२ मार्च हा दिवस ' जागतिक जल दिन ' म्हणून साजरा करण्यात येतो. तर मित्रांनो, दैनंदिन जिवन जगत असतांना आपल्याला वेळोवेळी पाण्याची गरज भासत असते. पाण्याशिवाय आपली तहानच जात नाही, आणि एक तर उन्हाळा सुरू आहे म्हटल्यावर वेळोवेळी पाणी हवचं. आपण कुठेही बाहेरगावी जातो तर, आपल्या जवळ छोटीशी पाण्याची बोटल आपण ठेवतोच. आणि पाण्याशिवाय जिवन जगणं मात्र कठिणच. तसेच, सर्व सजीवांनसाठी पाण्याचे महत्व अपरंपार आहे.
            
                        पाणि हे निसर्गाची दिलेली सर्वात महत्वाची देणगी आहे.
आणि त्यातही आपण पाण्याचा भरभक्कम वापर करून ते पाणि वाया घालवितो. आपण प्रत्येक ठिकाणी किंवा आपण आपल्याच घरचं उदाहरण घेऊ या, आपण साधा नळ सुरू असलेला पूर्णपणे बंद करत नाही, नळ बंद केल्यावरपण थोडा सुरूच राहतो, अश्याचं छोट्या- छोट्या बारीक गोष्टिमुळे पाणि वाया घालवितो. ज्यांना पाणि मिळत नाही ह्यांचा विचार केलाय का? आपण कधी....!  कालचं आमच्या सरांनी आम्हाला आदिवासी समाज शिकवितांना प्रश्न केलाय की, तहान म्हणजे काय? तर, त्यांनी सांगितले की, कही लोक रोडवर भटकतात त्यांना आपण ' पारधी ' असे आपल्या भाषेत म्हणतो. त्या लोकांना भुक काय असते त्याचे महत्व कळतेच परंतु त्याच्यासोबतचं पाण्याचे महत्व सुद्धा कळते. हे आपण लक्षात घेतले आहे का कधी....... मुळीच नाहीनं ! ते पाण्यासाठी, अन्नासाठी किती व्याकुळ झालेले असतात. ते लोकं आपण त्यांना पारधी म्हणतो. ते आदिवासी जमाती मधलेच आहे. 

                         आदिवासी जमातीतील लोकं निसर्ग देवतेची पुजा करीत असे. आणि जंगलतोड मुळीच करत नसे. जर एखादं झाड खराब दिसलं की, ते तोडून त्या जागी तेच स्वत: नविन झाड लावत असे. अशाच काही गोष्टी खरंच त्यांनच्या कडून शिकण्यासारख्या आहे.
मित्रांनो, मला पण ह्या बद्दल माहिती नव्हतं, आमच्या सरांनी काल आदिवासी समाजा बद्दल थोडफार सांगितल तर हा भाग मला पाण्याशी, निसर्गाशी संबंधित वाटला म्हणून मी आज हा लेख लिहत असतांना ह्या गोष्टी लक्षात ठेऊन हा लेख लिहला. ह्या सर्व गोष्टीचा संबंध निसर्गापासुन च असतो. पाणी पण निसर्गापासुन च निर्मित असते/आहे. ही एक निसर्गाने दिलेली देणगी आहे. 

                            तर ,आज " जागतिक जल दिन " हा दिवस ' युनाइटेड नेशन ( वाॅटर) UN water ' ही संस्था या दिवसाचे आयोजन करते. 
१९९३ साली प्रथम " जागतिक जल दिन " साजरा करण्यात आला. 
मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, पाण्याचा प्रमुख स्त्रोत पाऊस आहे. बर्फ, नदी, तलाव, विहीरी, बोअरवेल हे पाण्याचे दुय्यम स्त्रोत नसून, हे स्त्रोत पावसाच्या पाण्याची वेगवेगळे रूपे आहेत. पावसाचे प्रमाण जेवढे जास्त असेल, तेवढे पाण्याचे प्रमाण जास्त राहील. पाणी ही नैसर्गिक संपत्ति असल्यामुळे  त्यावर मानसाइतकाच इतर, सजीवांचा तेवढाच पुरेपूर हक्क आहे. असे मला वाटते. पाण्याशिवाय माणूस, पशु- पक्षी निर्जीव च आहे.

                        आज, प्राणी-पक्षी देखील पाण्यासाठी भटकंती करतांना दिसतचं आहे. आणि उन्हाळा असल्यामुळे त्यांना तरी कुठे पाणि मिळत असणार! हा विचार तुम्ही केला आहे का? तर मित्रांनो, तुम्ही पण पक्ष्यांनसाठी घरावर थोडसं पाणी ठेवत चला...! भर ऊन्हाळयात पाखरे पाण्याच्या शोधात असतात. तेच पाणी तुम्ही तुमच्या घरावर किंवा अंगणात जरी ठेवलं तीचं पाखरे येऊन, पाणी पिऊन जातील. आणि करता-करता बरेच से पाखरं तुमच्या कडे त्या जागेवर पाण्याच्या शोधात येईल. आणि हे करणं म्हणजे, पुण्यांच काम राहील. जमत असेल तर बघा.........! 
म्हणून च आपण म्हणतो पाणी हेच जीवन.

                            - एकता चौधरी

Friday 18 March 2022

तिचं दु:ख......

दारू पिऊन खेड्यातील बायकोला मारहाण करण्याच व तिच हे सगळं काही सोसण्याच दू:ख मी माझ्या या कवितेत गावठी शब्दात मांडलेल आहे. 
आणि हेच दृश्य अजून पण आढळून येत आहे. 

तिचं दु:ख...... 

आया- बाया म्हणत्यात, 
 तुले कायचं टेंशन नाही, पण 
माया मागं कायचं सु:ख नायी, 
अणं तुले माया मागचं दुख हाय ते दिसत नाही 
तरीबी तु म्हणते तुले कायचं टेंशन नाही, 

नवरा पिऊन येतो, काम त्याले होतं नाही
 दिस-भर मी शेतात लेकरासाठी झुरती 
तरी बी मीचं त्याले खुपती अनं, 
रात्रि पैश्यासाठी मले तो मारती
तरीबी तु मले म्हणते तुले कायचं टेंशन नाही, 

पोरांन ले शाळेत कशी घालु 
हे रायतं टेंशन माया मागं, 
नवरा दारु पिऊन, रोड वर लोयतो 
तरी बी  त्याले मी घरात घेतो, 

म्हणाले- बोलाले त्याले कुणी नाही
नशेत कुणाच्या बापाच ऐकाले तयारं नाही 
तरीबी तु म्हणते तुया मागं कायचं टेंशन नाही,  

माय हे ,
माया मागची कट-कट 
सांगु तरी कुणाले,तरी बी
आया बाया म्हणत्यात तुले कायचं टेंशन नाही,  

सांगत नायी कुणाले,नवरा मले प्याले पैसे माघते, 
कसे दिसं काढले ते मायं मले माहित रायते, 
तरीबी तु म्हणते तुले कायचं टेंशन नाही.

- एकता चौधरी.

Wednesday 16 March 2022

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर / १६ मार्च १६९३

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर / १६ मार्च १६९३ 
                  
                       16 मार्च  आज मल्हारराव होळकर यांची जयंती.१६ मार्च १६९३ साली मल्हारराव होळकर ह्यांचा जन्म झाला. त्याचं गाव पुणे नजीकचं ‘होळ’. या गावावरून त्यांना होळकर हे नाव मिळालं.  धनगर कुटुंबात जन्मलेले  एक सरदार होते. मल्हारराव होळकर  मराठ्यांच्या इतिहासातील एक कर्तबगार सेनापती व इंदूर संस्थानचे संस्थापक होते.
दुभती जनावरे आणि मेंढी पालन करणा-या भटक्या धनगर समजातील खंडूजी वीरकर चौगुला यांच्या घरात मुलगा जन्माला आला आणि त्याचे नामकरण मल्हार करण्यात आले. त्यावेळी धनगरी तांडा होळ मुक्कामी होता, "मुलाचे पाय पाळण्यात दिसतात" या उक्तीप्रमाणेच छोटा मल्हार तांड्यातील मुलांबरोबर खेळताना आपले गुण दाखवू लागला. मल्हार लहान असतानाच खंडूजीचा मृत्यू झाला आणि मल्हार व त्याच्या आईवर भाऊबंदांचा जाच वाढू लागला, म्हणून दोघांनी सुलतानपूर परगण्यातील तळोदे येथे भोजराज बारगळ मामाकडे आश्रय घेतला. होळ गावातील वास्तव्य संपले परंतु होळचे नाव त्यांच्यामागे  कायमचेच राहले.

                       मल्हारराव होळकर शिपाईगिरी करीत असतांना, बाजीराव पेशवे ह्यांच्याशी मैत्री झाली. आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर इसवी सन १७२९ च्या सुमारास त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळवली. मल्हारराव होळकर  ह्यांच्या चार पत्नी होत्या. १)  भोजराजमामांची मुलगी गौतमी हिच्या बरोबर मल्हाररावांचा विवाह झाला आणि त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव खंडेराव ठेवण्यात आले. २) द्वारकाबाई होळकर या मल्हारराव होळकरांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. द्वारकाबाई आणि मल्हारराव होळकर यांना एक मुलगी होती. ज्यांचे नाव सीताबाई होते. ३) बनाबाई होळकर या मल्हारराव होळकरांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. ४) हलकोबाई होळकर या मल्हारराव होळकरांच्या चौथ्या आणि शेवटच्या पत्नी होत्या.
 
                                माधवरावांच्या काळात मल्हारराव होळकर हे माधवरावांनाही वचकून असत. जाटांच्या पारिपत्याकरिता रघुनाथ - रावांबरोबर अलमपूर येथे आले असता तेथेच अतिश्रमाने वृद्धापकाळी मल्हाररावांचे निधन झाले.  मल्हारराव होळकर धाडसी व शूर होते.तर राजकारण आणि राज्यकारभारातही हुशार होते.बाळाजी बाजीराव व त्यानंतरचे पेशवेमाधवराव आणि दादासाहेब मल्हारराव होळकर  यांना पित्यासमान मान देत होते. व तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी  उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्याच्या कामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदीपर्यंत वाढविल्या.
मराठा साम्राज्याचा उत्तरेचा बुरुज..... मराठा भगवा पताका अटकेपार फडकवणारे श्रीमंत सुभेदार.... इंदौर संस्थानचे अधिपती.... अखंड आयुष्य मराठा साम्राज्याशी निष्ठा ठेवणारे... श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.....💐💐

-एकता चौधरी

Tuesday 15 March 2022

कृष्ण आणि बलदाऊ ह्यांचे होळी सोबतचे नाते.....!

कृष्ण आणि बलदाऊ ह्यांचे होळी सोबतचे नाते.....!                       

                         होळी या सणाला खुप महत्व आहे. परंतु,इतिहास पाहला तर भारतातील शेतकरी वर्गात होळी या सणाचे खास महत्त्व आहे. होळी या सणा चे सर्वात जवळचे नाते म्हणजे  कृष्णआणि बलराम. 

श्री कृष्ण आणि बलराम ह्यांचे होळी सोबतचे नाते.....! 

                      आपण या लेखात  पाहणार आहोत, तर मित्रांनो, रंगपंचमी हा वसंत ऋतूशी संबंधित महत्त्वाचा सण आहे. हा सण उन्हाळा संबंधित सण आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो. उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि थंडावा मिळावा यासाठी एकमेकांच्या अंगावर पाणी उडविण्याची रीत आहे.
संपूर्ण भारतामध्ये रंगपंचमीचा सण साजरा  अशा प्रकारे केला जातो.
श्री कृष्ण च्या काळात म्हणजे च द्वापरयुगात गोकुळात बाल कुमार कृष्ण आपल्या गोपाळ सवंगड्यांवर व बलराम /बलादाऊ सोबत पिचकारीने रंगीत पाणी उडवीत असे. बलराम हा श्रीकृष्णाचा सावत्र भाऊ होता,  श्रीकृष्ण जयंतीच्या एकदोन दिवस आधी,म्हणजे षष्ठीला बलराम जयंती असते.
दाऊजी बलदेव मंदिर,ब्रजभुमी मथुरा हुरंगा (होळी), होळीच्या नंतर एक दिवस साजरा केला जाणारा दाऊजी मंदिराचा हुरंगा जगभरात प्रसिद्ध आहे. दाऊजी या बलरामाचे मुख्य 'बलदेव मन्दिर' मथुरात आहे. बलराम ला श्रीकृष्ण चा मोठा भाऊ मानल्या जाते. 
तुम्हाला माहितच असेल कृष्ण, बाळगोपाळ किती नटखट होते ते बलदाऊ सोबत होळी च्या दिवशी गोकुळ मधल्या गोपिकांना रंगविण्यासाठी   वेगवेगळे तर्क लावत असे😃.
                          
                             त्या काळी पळसाच्या फुलापासुन रंग तयार केले जात होते.व याच बरोबरच फुलांच्या पाकळ्या, मेंहदी, गुलमोहराची पाने, टमाटर, हळद, डाळीचे पीठ, बीट अशा नैसर्गिक पदार्थांपासून रंग तयार केले जात असे.
होळी चा श्रीकृष्णाशी अतूट संबंध आहे. राधा-कृष्णाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून या सणाकडे पाहिले जाते. 
महाभारतातील एका कथेनुसार, युधिष्ठिराला श्रीकृष्णाने सांगितले होते- एकदा श्री रामाचे पूर्वज रघुच्या अधिपत्याखाली एक असुर स्त्री होती. कोणीही तिला मारू शकत नव्हते, कारण ती वरदानाने संरक्षित होती.  तीला कुणाची च भिती नव्हती परंतु, रस्त्यावर
खेळणाऱ्या मुलांशिवाय तीला कोणाचीच भीती वाटत नव्हती. तेव्हा
एके दिवशी गुरू वशिष्ठांनी सांगितले की -  लहान मुले हातात लाकडाचे तुकडे घेऊन  शहराच्या सीमेजवळ तर गेले आणि कोरड्या गवताचा ढीग करून त्या ढीक ला जर जाळले तर त्या असुर स्त्री मारले जाऊ शकते.
व हे सगळ करुन झाल्यावर गाणे, ढोल वोलवून नाच, नृत्य करा असे सांगण्यात आले व त्याच प्रमाणे हे सगळं करण्यात आले. म्हणून हा
दिवस एक सण म्हणून होळी साजरा केला जातो, जो वाईटावर निष्पपाप 
हृदयाचा विजय दर्शवितो.
व तसेच, 
                 राधा-कृष्णाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून या सणाकडे पाहिले जाते. त्याच वेळी, पौराणिक कथेनुसार, कंसाला जेव्हा गोकुळात कृष्णाच्या उपस्थितीची माहिती मिळाली तेव्हा त्याने गोकुळात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मारण्यासाठी पुतना नावाच्या राक्षसी  ला पाठवले. पुतना स्तनपानाच्या बहाण्याने लहान मुलांना विष पाजत होती. पण कृष्णाला त्याचे सत्य समजले. त्यांनी पुतना दूध काढत असताना ठार मारले. तेव्हापासून होळीचा सण साजरा करण्याची मान्यता सुरू झाल्याचे सांगितले जाते.
पुराणात सांगितले आहे की, एका राक्षस राजाचा मुलगा 'प्रल्हाद' 
भगवान विष्णूशिवाय, इतर कोणत्याही देवाची पूजा करत नाही,  तेव्हा तो राक्षस राजा संतप्त झाला आणि शेवटी त्याने आपली बहीण होलिकाला प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन अग्नीत बसण्याची आज्ञा दिली, कारण होलिका त्याच्याकडे होती. एक वरदान होत की आग त्याला इजा करू शकत नाही. पण नेमके उलटे घडले, होलिका जळून राख झाली आणि प्रल्हाद भक्ताला काहीही झाले नाही. याच घटनेची आठवण म्हणून या दिवशी होलिका दहन करण्याचा कायदा आहे. अशाप्रकारे भगवंत आपल्या अनन्य भक्तांचे रक्षण करण्यासाठी सदैव उपस्थित असतात हा संदेश होळीचा सण देतो. म्हणूनच  ह्या उत्सवाला "होलिकादहन" किंवा "होळी", असे म्हणतात. व महाराष्ट्रात होळीच्या दिवशी काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, व पेटलेल्या होळीभोवती प्रदक्षिणा घालतात. 
होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. व आपल्या महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे. आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो. 

                                        _एकता चौधरी


योगदान महापुरुषांचे

योगदान महापुरुषांचे

संता, पंतानी नटले माझ्या मराठी बोलीचे मान
त्यांच्या करतृत्वाने टिकले माझ्या महाराष्ट्राची शान, 
त्यांच्या ओवीतुन पाझरे भक्तिरसाची जाण
हेच आहे माझ्या महाराष्ट्राचे मान, 

थोर पुरुषी निष्ठा लाभले आम्हास
 राहूनी एकजुट सांगतोस  त्यांचा अभिमान तुम्हास,
लढूनी मरण पत्कारले, तरी उंच शिखर मात्र त्यांनी गाठले
महाराष्ट्राच्या भुमित सळसळते रक्त मिसळले
तरी महाराष्ट्राची शान त्यांनी च टिकविले, 

बहिनाबाई, केशवसुत सारखे कवि लाभुनी 
महाराष्ट्रास कळविले कवितेचे द्यान, 
हेच आहे माझ्या महाराष्ट्राचे मान

विषाचा प्याला पिऊन 
अमरुताचा गोडवा आम्हास दिला, 
संता-पंता नी माझा महाराष्ट्र नटला.

                            _एकता चौधरी

Friday 11 March 2022

मुलींच आयुष्य किती वेगळ असतं ना!

मुलींच आयुष्य किती वेगळ असतं ना! 
   
                      मुलगी सासरी गेली की, तिला माहेरच समजल्या जाते. आणि लग्नाआधी माहेरी राहली की, काही शुल्लक कारणांवरून म्हटल्या जाते की तुला सासरी गेल्यावर कळेल! तीला कुठलचं घरदार नसते, लग्नानंतर ती माहेरी आली की तिलाच स्वत:च्या घरी पाहूनीन समजल्या जाते. मुलीला कधी आपल म्हणून वागविल्या जात नाही.
ती चार- चौघात बसली की, तीला घरात जा म्हणून सांगतात. ती जोरात हसली / बोलली की, सासरी नावं ठेवतात असं म्हणतात. ती जास्त बोलली की, अगाऊ आहे असं म्हणतात, थोडसं मनमोकळे पणाने वावरले की म्हणतात, मुलीला वळणचं नाही! अशा प्रकारचे उध्दार मुलींनसाठी वापरले जातात.

                    असचं असत मुलीच जीवन, ज्या कुटूंबात मोठ्ठ व्हायच असतं, तेच कुटूंब तिला सोडून जायच असतं. ज्या बहिणीला भांडून रडवायचं असत, तिलाच सोडून जायच असतं.
दोन घराच दान तिच्या पदरात पडलेलं असतं. तिला एका घरी म्हटल्या जाते ' दिल्या घरी सुखी राहा ' दुसरी वेळ आली की तुझ्या तु घरी जा! तिलाचं माहिती नसतं , नेमकं कुठल तिच घर आहे. सगळी घरातील माणसे आपलीशी करून घेते ती,  पण तिलाच परकं समजल्या जाते. शेवटी ती परक्याची लेक  दुसऱ्याची लक्ष्मी च होते.

                            घरातली बोलकी बाहुली असणारी ती आज लग्नानंतर शाहण्यासारखी वागते,  घरात हक्काने/ जिध्दीपणाने वागणारी ती आता कशाला पण नकोचं म्हणते. माहेरी,  " आई मला भुक लागली जेवायला दे "
म्हणणारी सासरी गेल्यावर सगळयांना वाढून झाल्यावरचं जेवायची सवय करून घेते. आई च्या घरी स्वयंपाक घरात न शिरलेली ती सासरी मात्र ,    'बायको ' म्हणून ती नवऱ्यासाठी मन लावून स्वयंपाक करते.
असंच जिवन मुलीचं असते! 

                         एकता चौधरी

Thursday 10 March 2022

छत्रपती संभाजी महाराज 11 मार्च 1689

छत्रपती संभाजी महाराज 11 मार्च 1689

                        मित्रांनो आज 11 मार्च, 11 मार्च 1687 रोजी छत्रपती संभाजी राजे ह्यांचे निधन झाले. छत्रपती संभाजी राजे हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते.छत्रपती संभाजी राजे ह्यांचे जिवन त्यांच्या  वडिलांप्रमाणे कर्तुत्वनिष्ठित गेलं.
छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ मध्ये पुरंदरच्या किल्ल्यावर झाला आणि महाराष्ट्राला दुसरे छत्रपती लाभले. संभाजी महाराजांना छावा आणि शंभूराजे असे देखील म्हटले जाते. संभाजी राजाच्या जन्मानंतरच दोन वर्षांत त्यांची आई सईबाईंचे निधन झाले.
त्यानंतर संभाजी महाराजांचा सांभाळ शिवाजी महाराजांच्या आईने म्हणजेच संभाजी महाराजांच्या आजी जिजाबाई यांनी केले.
त्यांची दुसरी सावत्र आई सोयराबाई यांनी महाराजांना पोरक्या प्रमाणे वागवले त्यांना नेहमी त्यांचेच मूल पुढे जावं असं वाटायचं म्हणून त्यांनी महाराजांच्या शासकीय कारकिर्दीत देखील खूप वेळा ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला होता. 
महाराजांचे वडील शिवाजी राजे आणि आजी जिजामाता असल्यामुळे लहानपणापासूनच संभाजी महाराजांना लढाईचे प्रशिक्षण दिले.

                             संभाजी महाराज अतिशय हुशार होते. त्यांना संस्कृत आणि आठ इतर भाषा देखील येत होत्या. महाराजांना राजकारण अतिशय लहान वयातच कळायला लागल होता. संभाजीराजांचे लग्न पिलाजीराव यांची कन्या जीवाबाई यांच्याशी झालं.लग्नानंतर मराठी चालीरीती नुसार जीवाबाई यांचे नाव येसूबाई असं ठेवण्यात आलं.
संभाजी महाराज लहानपणी शिवाजी महाराजांच्या सोबत आग्र्याला गेले तेव्हा, ते शिवाजी महाराजांचे दूरचे मंत्री रघुनाथ कोरडे यांच्या दूरच्या नातेवाईकांच्या घरी काही काळ थांबले होते. तिकडे संभाजी महाराज एक ते दीड वर्ष थांबले होते. त्या काळामध्ये महाराज एक ब्राह्मण बालक म्हणून जीवन जगत होते. 
संभाजी महाराजांनी त्यांचे वडील शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ संस्कृत मध्ये बुद्ध चरित्रही लिहिले होते. त्यासोबतच संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ वयाच्या अगदी चौदाव्या वर्षी लिहिला.

                              छत्रपती संभाजी महाराज जे शंभुराजे म्हणून देखील ओळखले जातात.मराठा साम्राज्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणजे औरंगजेब आणि विजापूर आदिलशहा होते.संभाजी महाराजांनी एकूण २१० युद्ध लढली. प्रत्येक युद्धामध्ये ते नेहमीच यशस्वी झाले. म्हणूनच त्यांना शिवबाचा छावा असे देखील म्हटले जाते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर आता स्वराज्याची जबाबदारी संभाजी महाराजांवर आली होती. 
१६ जानेवारी १६८१ मध्ये महाराज यांचा राज्याभिषेक झाला. 1 फेब्रुवारी, 1689 होते. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना विदूषक म्हणून परिधान केलेल्या उंट परिधान करून मुघल छावणीत नेण्यात आले. 
छत्रपती संभाजी महाराजांना आपले सर्व किल्ले मोगलांना देण्यास सांगितले गेले. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांन समोर अनेक मागण्या ठेवल्या आणि सांगितले की जर ते सहमत झाले तर त्यांचे प्राण वाचले जातील. छत्रपती संभाजी महाराजांना इस्लाम स्वीकारण्यासही भाग पाडले गेले. तेव्हा महाराजांनी हे सर्व स्वीकारण्यास नकार दिला. नेमक त्याच वेळी शिवाजी औरंगजेबाच्या कैदेतून सुटून मराठा साम्राज्य स्थापन करण्यात यशस्वी झाले .
       
                        औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना अत्याचार करून ठार मारण्याचा आदेश दिला. सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची जीभ कापल्या गेली. दुसऱ्या दिवशी त्याचे डोळे कापले गेले .  तेव्हा त्यांना सांगण्यात आले की,  जर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला तर त्याचे प्राण वाचले जातील.  परंतु महाराजांनी असे केले नाही. यानंतर, त्याचे सर्व भाग एक एक करून कापले गेले. परंतु संभाजी महाराज झुकले नाहीत. सलग तीन आठवडे त्याच्यावर अशाप्रकारे अत्याचार करण्यात आले. तीन आठवड्यांच्या अशा अत्याचारानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा गळा चिरला गेला. त्यांना फाशी देण्यात आली. त्याचा मृतदेह कुत्र्यांसमोर फेकला गेला. 11 मार्च, 1689 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्याचे डोके दख्खनच्या अनेक मोठ्या शहरांमध्ये फिरत होते. औरंगजेबाने आपली भीती टिकवण्यासाठी आणि हिंदूंच्या आत्म्याला हादरवण्यासाठी हे केले.  संभाजी महाराजांच्या निधनांनंतर बलदानी छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाने संपूर्ण भारतीय उपखंडात भगवा मराठा ध्वज फडकवला. पुढे जाऊन, बाजीरावांसारख्या महान योद्ध्यांनी हे साम्राज्य यशस्वीपणे चालवले. 

                       महाराजांनचा इतिहास म्हटला की अंगावर काटेच येतात म्हणून तर आज आपल्या मातीसाठी जीवाची पर्वा न करणारे शंभू राजे आजही अनेक लढवय्यांचे श्रद्धस्थान आहेत.
आणि खरच मनातून किती छान वाटत ना की , आपण त्या  महाराष्ट्रात जन्माला आलो जिथे महान व्यक्ती जन्माला येऊन गेल्या, इतिहासाच्या पानावर, राज्य करणारे संभाजी राजे यांच्या स्मृतिस त्रिवार अभिवादन! 💐
      
                                             _एकता चौधरी

Wednesday 9 March 2022

सावित्रीआई फुले / १० मार्च १८९७

 सावित्रीआई फुले / १० मार्च १८९७
    
                       
                          भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि पहिल्या महिला शिक्षिका  सावित्रीआई फुले, आज १० मार्च, १० मार्च १८९७ रोजी सावित्रीआई चे निधन झाले.
मित्रांनो, तुम्हाला प्रश्न नक्की चं पडला असेल की मी या लेखात सावित्रीबाई फुले  न. म्हणता सावित्रीआई फुले का म्हटले असेल? 
तर, बाई या शब्दाचा अर्थ बरेच निघतात, 
उदा- बाई म्हणजे महिला आणि एखाद्या च्या घरात घरकामाला कामवाली असते तिला पण आपण बाई च म्हणतो तर बाई या शब्दाचा अर्थ वेगवेगळा होतो परंतु आई या शब्दाचा अर्थ मात्र एकच होतो . आणि सावित्रीबाई फुले ह्या सगळयांनसाठी आई समानच होत्या पुन्हा त्या पहिल्या महिला शिक्षिका  होत्या. आपण जेव्हा जन्माला येतो आल्यबरोबरच आपल्याला कहीच येत नसतं, पण जसं- जसं मोठ होत जातो, तसं -तसं आपली आईच आपल्याला प्रत्येक गोष्टिच वळण लावते तर ह्याच वरून कळते की आई आपली पहिली गुरु, शिक्षिका आहे. तर माझ्या मते आपण सावित्रीबाई फुले न म्हणता सावित्रीआई फुले म्हणायला हवं! 

                                सावित्रीआई फुले ह्यांना स्त्रीवादाची जननी मानल्या जाते.  त्याच बरोबरच सावित्रीआई फुले ह्या कवयित्री सुध्दा होत्या. ह्यांनचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी   नायगाव (ता.खंडाळा, जि. सातारा) येथील झाला. खंडोजी नेवसे-पाटील यांच्या   त्या कन्या होत्या.
त्यांच्या आईचे नाव ' सत्यवती नेवसे ' असे होते. इ. स. १८४० मध्ये ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचे लग्न झाले त्यावेळी ज्योतिबांचे वय तेरा वर्षाचे तर ,सावित्रीबाईंचे वय नऊ वर्षांचे होते. लग्न झाले तेव्हा त्या पूर्ण निरक्षर होत्या. 
त्या काळी बायकांनी शिकणे हे महापाप आणि त्यांना शिकविणे हे तर महाभयंकर पाप, असे त्या काळी सर्वच समाज समजत होता. परंतु  ज्योतिबांनी आपल्या अशिक्षित पत्नी सावित्रीआई यांना स्वतः घरी शिक्षण दिले व नंतर त्यांची शिक्षिका म्हणून शाळेत नेमणूक केली. तेव्हा सावित्रीबआई शाळेत जाऊन मुलींना शिकवू लागल्या. त्यावेळी त्या काळातील लोकांनी सावित्रीआईंना विविध प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली. सावित्रीआई शाळेत जात-येत असतांना लोक त्यांना अपमानास्पद भाषा वापरत आणि निंदा करीत.  काही  लोक त्यांच्या अंगावर चिखल-शेण फेकीत , त्यांना दगड मारीत पण सावित्रीआईंनी आपले काम निष्ठेने चालू ठेवले. 
   
                        महात्मा फुले यांनी विधवा स्त्रियांच्या निराधार मुलासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले.या गृहातील अनाथ मुलांची काळजी घेण्याचे काम सावित्रीआई करीत असे. या अनाथ मुलावर त्या मातेच्या वात्सल्याने प्रेम करीत व त्याची सर्व प्रकारची सेवा करीत होत्या. सावित्रीआई फुले , महात्मा फुले ह्यांना पुत्र नव्हते तर त्यांनी, एका अनाथ मुलाला ‘यशवंता’ ला त्यांनी दत्तक घेतले. व त्यानंतर सावित्रीआई फुले व त्यांचा मुलगा यशवंत ह्यांनी' नालासोपारा 'परिसरात बुबोनिक प्लेगच्या जगभरातील तिसऱ्या साथीच्या रोगाने प्रभावित झालेल्यांवर उपचार करण्यासाठी एक क्लिनिक उघडले.क्लिनिकची स्थापना पुण्याच्या बाहेरील भागात, संसर्गमुक्त भागात करण्यात आली. 
पांडुरंग बाबाजी गायकवाड यांच्या मुलाला वाचवताना सावित्रीबाईंचा वीरतापूर्वक मृत्यू झाला. गायकवाड यांच्या मुलाला मुंढव्याबाहेरील महार वस्तीत प्लेग झाला हे कळताच सावित्रीबाई फुले त्यांच्या पाठीशी धावून गेल्या आणि त्यांना पाठीवर घेऊन रुग्णालयात नेले. या प्रक्रियेत, सावित्रीबाई फुले यांना प्लेगची लागण झाली आणि १० मार्च १८९७ रोजी रात्री ९.०० वाजता सावित्रीआई फुले यांचा मृत्यू झाला. परंतु आजही त्यांचे आचार- विचार आपल्या स्मरणात आहे. त्या आज नसल्या तरी आजही विचारांच्या/ कर्तुत्वाच्या बाबतीत त्या आपल्यातच आहे. म्हणूनच, कष्टाने शिक्षण घेतलेल्या मुलीला किंवा स्त्रीला सावित्रीची लेक म्हणायची रीत पडली आहे. 

                                        _ एकता चौधरी

कौतुक करायचे, तर कुणाचे?

कौतुक करायचे, तर कुणाचे?

             एखाद्या गोष्टीच्या चांगल्या गुणांन विषयी काढलेले उद्दगार! यालाच आपण कौतुक म्हणतो.किंवा एखादा व्यक्ति चारचौघात स्वत:च्या मुलाचे/मुलीचे प्रशंसा करत असेल, याला कौतुक करने असे आपण म्हणतो.
समोरच्या मुलाला तुच्छ लेखुन आणि आपण आपल्या मुलाचे चारचौघात कौतुक/कुतुहल करत त्याची वा-वा करत आहोत ह्याला कौतुक म्हणावे का? 

तर प्रश्न असा पडतो, "कौतुक करावे तरी कुणाचे? "
एखाद्या मुलाने किंवा मुलीने वर्गातुन पहिला क्रमांक प्राप्त केला असेल तर त्यांच कौतुक त्यांची वर्गशिक्षिका करते. त्यांच कौतुक पुर्ण वर्गामध्ये होत आहे हे बघुन तो किंवा ती आनंदित होऊन जाते,मग
नंतर च्या पेपर च्या वेळी तीच व्यक्ति हा विचार करते की, आपला तर अभ्यास पुर्णपणे झाला आहे, आपण तर मागच्या पेपर मध्ये पहिला क्रमांक  मिळवला होता, आणि आता येणाऱ्या पेपर मध्ये तोच syllabus असेल, मग कश्याला एवढा अभ्यास करायचं, आणि जस मागे आपलं कौतुक पुर्ण वर्गात केलं, यावेळी पण आपलचं करणार असा हा सहाजिक विचार तो व्यक्ति करतो.
आणि ह्याच विचारामुळे तो मागे राहतो. प्रत्येकांना वाटते, सगळयांनी आपलं कौतुक करावं.
                   मित्रांनो, कौतुक करायचंच असेल तर, तुमच्या सोबतच थोड समोरच्याचं पण थोड तरी करा! त्यांना पण बरे वाटेल.
               आता बघा, नातेवाईक घरी येतात, बसतात चहा घेतात, नाश्ता करतात सोबतच गप्पा- गोष्टी होतात. आणि, त्याच बरोबर आपल्या मुलांचे कौतुक करतात, बढाया देतात आणि आपण ऐकतो, तेच नातेवाईक गेल्यानंतर रात्री आपण, आपल्या मुलासमोर किंवा मुलीसमोर त्यांची गोष्ट काढतो, म्हणतो, "बघ! रे त्यांनचा मुलगा किती हुशार आहे, त्यांनची मुलगी डाॅक्टर आहे इ...., आणि तु बघं नुसता झोपा काढतो, T. V बघतो."
असं आपण आपल्या मुलीला/मुलाला म्हणतो.
अरे; तर, सगळयांची बुध्दि सारखी नसते नं, कुणाला कोणत्या गोष्टीत आवड असते तर, कुणाला कुठल्या 
गोष्टीत, हा महत्वाचा मुद्दा असतो.
जर, तुम्ही तुमच्या मुलांचे मन मारुन, तुमच्या प्रमाणे, त्यांनची इच्छा नसतांना, तुमच्या मताप्रमाने education करायला सांगता आहेत तर त्याला त्या गोष्टीत  interest कसा येईल? 
उदा. जर त्याला इंनजिनियर बनायच आहे आणि तुम्ही म्हणतं आहात की, तुला डाॅक्टरचं व्हायचं,
तु फक्त त्याचाच अभ्यास करायचा.
असं-कसं होईल,त्याच तेइंजीनियर 
चं स्वप्न अपुर्ण राहिल.आणि जेव्हा त्याचा वाढदिवसं येतो तेव्हा तुम्ही चं म्हणतात नां! की, "तुझे सगळे स्वप्न पुर्ण होवो" असा आशिर्वाद 
त्याला तुम्ही देता.आणि त्याच जे इंजीनियर चं स्वप्न आहे ते फक्त स्वप्न च  राहिलं मग असे म्हणुन त्याच्या जखमांनवर नमक का छिडकताय! 
मित्रांनो, मी फक्त तुम्हाला उदाहरण सांगितलं.
               तर आता महत्वाचा मुद्दा 
म्हणजे, " कौतुक करायचे तर, कुणाचे? "
कुणी-कुणी आपले कौतुक करुन घेते तर, कुणी स्वत:हून सहखुशीने कौतुक करते.स्वत: आपले कौतुक दुसऱ्या कडून करून घणे,त्यांनी केलेल्या कौतुकाची वा-वा करणे ह्याला कौतुक करणे असे म्हटल्या जात नाही.
                 कौतुक करायचे चं असेल तर, एखाद्या रस्त्यावर झोपणाऱ्या लोकांच,ज्यांना घर नसुन ते रस्त्यावर राहून अख्ख आयुष्य काढतात, ताट नसुन जमिनीवर जेवतात.अश्या लोकांच 
कौतुक करा.त्यांना खुशी राहिल.
की, कुणी तरी आपल कौतुक करत आहे.आणि जेव्हा तुम्ही त्यांची मदत कराल, तेव्हा तेही तुमचे कौतुक करेल. ह्या पेक्षा आणखी कौतुकवान गोष्ट कुठली राहिल! 
                    तसेच, एखाद्या छोट्या मुलाचं कौतुक करुन बघा कुठल्याही बाबतीत ते लहान मुल घरफिरून पुर्ण घरात सहखुशीने सांगत फिरेल, आणि त्याच्या चेहऱ्यावर निरागसतेचं हसु राहिल.
               माझ्या मते, मला अस वाट्टे, जर कौतुक करायचंच असेल तर ह्या लोकांच करा, जे तुमच्या घरी येऊन स्वत:च्या मुलाच कौतुक करत असेल, स्वत:च वा-वा करत असेल, ह्याला कौतुक करणे म्हणता येणार नाही.....! 

   _ Ekta Chaudhari

किताब मोहब्बत की

||किताब मोहब्बत की ||

मोहब्बत की किताब लिखते- लिखते
हम खुद ही गुम हुऐं , 
मोहब्बत का ऐलान करते- करते
खुद ही उसमें डुब गए ||

सोचा था, मोहब्बत को
कोरे कागज़ पे बेनकाब कर दूॅं, 
पर कागज़ ही शरमा गए ||

तब सोच में पड गए
एैसा क्या लिख दिया हमनें, 
तब जा के पता चला की
कलम़ को भी कागज़ से मोहब्बत है ||

मोहब्बत का किताब लिखते- लिखते
कलम़ ने ख़ुद को बेनकाब कर दिया, 
जिस्से आज कागज़ भी कलम़ के बिना 
अधुरा है ||

Monday 7 March 2022

॥ स्त्री॥

॥ स्त्री॥

असे संसार कसाही
हार मानुनी सोन्याचा
गळी स्वीकारी ती ,

वागवून चुल-मुल प्रत्येक क्षणाला
अत्याचाराच्या अग्नि परीक्षेला
समोरी जायी ती,

आले वाटेला लांछन
न भटकता
समोरी जायी ती,
असे कुटूंबाचा कणा 
स्त्री म्हणूनी ओळखी तीला,

आयुष्याच्या टप्प्यावर
भुमिका साकारी ती,
लेक, आई, बहीण, सुन, पत्नी
म्हणून साद घाली ती.

💫जागतिक महिला दिन 💫

💫जागतिक महिला दिन 💫

                  आज ८ मार्च, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन' म्हणून साजरा केला जातो १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सुचनेनुसार ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रिय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

                     तर, आज ८ मार्च जागतिक महिला दिन, हा दिवस साजरा करण्यामागे एकच उद्देश असतो तो म्हणजे, महिलांनी स्वतःच्या अधिकार / हक्कासाठी दिलेल्या लढयाच्या स्मरणार्थ म्हणून ' जागतिक महिला दिन' साजरा केल्या जातो. १९ शतकात स्त्रि जातीला खालच्या दर्जाची वागणूक दिली जात असे, आणि आताच्या काळात हे कमी प्रमाणात आढळून येत आहे. काही काळापूर्वी स्त्रीयांवर होणारा अन्याय, स्त्रियांचे हक्क / अधिकार याबाबत स्त्रीयांमध्ये हळू-हळू जागरूकता होऊ लागली यातून स्त्रीवाद निर्माण झाला. जागतिक महिला दिवस ला नारीशक्तीचा उत्सव असे पण म्हणता येईल.

                    पूर्वीच्या काळात स्त्री म्हटले की, त्यांना फक्त चुल आणि मुल सांभाळायचा हक्क होता. आज तो काळ पालटलेला आहे. व्यवहारीक जगात सगळ्याच क्षेत्रात स्त्रीयांनी आपली किर्ती स्थापित केली आहे, साहस, मेहनत, बुद्धिमत्तेच्या जोरावर आज स्त्रीयांनी एक नवीन ओळख बनवली आहे. आंतरराष्ट्रिय महिला दिन साजरा करण्याचा सर्वात महत्वाचा उद्देश्य म्हणजे, महिला आणि पुरुष यांच्यात समानता निर्माण करण्यासाठी जागरुकता आणणे, त्याचबरोबर महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करूण देणे, आजही काही देशांन मध्ये महिलांना समान हक्क नाही.
 मित्रांनो, माझ्या मते आपल्या भारत देशामध्ये, काही गावात महिलांना समान हक्क दिल्या जात नाही! ,कारण आजही महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येते.

                      आजच्या युगात घरकामां- सोबतच व्यवहाराचे काम पण स्त्री करते. आणि म्हणतात नं घरात महिला/स्त्री नसली की, घराला घरपण येत नाही. समजा आपली आई किंवा पत्नी बाहेरगावी कुठे गेली की काहीतरी रिकामं वाटल्या सारख वाटते. तिच्या असण्याची किंमत पैशात मोजता येत नाही. एवढेच नव्हे तर, शिक्षणाच्या क्षेत्रात स्त्री आघाडीवर आहे. आंतरराष्ट्रिय महिला  दिवशी महिलांना त्यांच्या मूल्यांची जाणीव होते. आणि स्त्रीशिवाय जीवनाची कल्पना करणे खूप कठीण आहे. महापुरुषांचा जन्म स्त्रिच्या पोटीच झाला आहे. जिच्यापासून त्या महान लोकांनी शिकवण घेतली आहे ती  स्त्री च आहे म्हणजेच त्यांची आई'.

                   आज जगभरात आंतरराष्ट्रिय महिला दिन साजरा करण्यासाठी मोर्चा, विविध कार्यक्रम राबविल्या जाते. आजही असे काही देश आहेत की जिथे महिलांना समान वागणूक दिली जात नाही. आणी त्याच देशांमध्ये महिलांच्या मुक्तीसाठी आंदोलने केली जातात. बऱ्याच लोकांना महिलांची भूमिका केवळ घरातील कामापुरतीच मर्यादित असते. आणि हे असे त्यांचे विचार बदलणे आवश्यक आहे. आणि महिलांना पुरुषांप्रमाणेच प्रत्येक गोष्टित समान स्वातंत्र्य आणि समान संधी प्राप्त करणे / करून देणे आवश्यक आहे. म्हणूनच बहिनाबाई चौधरी यांनी आपल्या " तुच तुझी वैरी " या कवीतेत म्हटले आहे की,

              " माणसानं म्हणत्यात
               मागं ठेवल्या बाया,
               पण एका हातानं सांगा
              वाजवतात का टाया "

🙏🏻😊जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”😊🙏🏻
                 
   
                             _एकता चौधरी.

Sunday 6 March 2022

दादोजी कोंडदेव ( ७ मार्च १६४९ )

 दादोजी कोंडदेव ( ७ मार्च १६४९ ) 

                     आज ७ मार्च . तर ७ मार्च १६४९ या दिवशी दादोजी कोंडदेव ह्यांचे निधन झाले.

दादोजी कोंडदेव हे कोण होते? 
   
               तर मित्रांनो, दादोजी कोंडदेव हे छत्रपती शहाजी राजे भोसले यांचे चाकर होते.दादोजी कोंडदेव यांचा जन्म १५७७ रोजी झाला.१६३६ पासून ते वयाच्या ७२व्या वर्षांपर्यंत ते शिवाजी महाराजांच्या जवळ होते.
दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक होते.
त्यांनी पुणे परगणा जहागीरीची देखेरेक करणारे सुभेदार पदाची चाकरी करत होते. ते शहाजी राजे भोसले यांचे चाकर होते. दादोजी कोंडदेव हे शिरूर येथील होते. 

                    दादोजी कोंडदेव हे  सिंहगडाचे किल्लेदारही
    होते. जिजाऊसाहेब व शिवाजीराजांना घेऊन पुणे जहागिरीत आले. तेव्हा जिजाबाई आणि शिवाजी राजे यांच्याकरिता दादाजी कोंडदेवाने पुण्यात लालमहाल नावाचा वाडा बांधला. ह्याच बरोबर शिवगंगेच्या काठी 
आंब्याची बाग लावून त्यांनी त्या बागेला शहाबाग असे नाव दिले. पुण्यापासून चार पाषाण म्हणून गाव आहे. तेथे दादोजीनी पेठ वसवून त्या गावचे नवे नाव ' पेठ जिजापुर' ठेवले. जिजाऊसाहेबांच्या खाजगी खर्चासाठी केळवडे व रांझे ही दोन गावे लावून दिली.
दादोजी कोंडदेव हे मलठण गावचे ते कुलकर्णी होते. यांचे मूळ आडनाव ' गोजिवडे ' असे होते. दादोजी आणि भोसले कुटुंबांचे संबध फार पूर्वीपासून होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी हिंगणी, बेरडी, देऊळगाव या गावांची पाटीलकी मिळविली होती. या गावांचा कुलकर्णी म्हणून दादोजी काम पहात असत. 

                      दादोजी कोंडदेव हे सुभेदार या नात्याने पुणे परगणा परिसरात दादोजीने दक्ष कारभाराने परिस्थितीत आमूलाग्र सुधारणा घडवून आणली. लोकांना सुरक्षित वाटण्यासाठी योग्य ते उपाय केले, निवाडे दिले, जमिनींचे मालकी हक्क निश्चित केले, जमिनींची प्रतवारी लावून मालिक अंबरची जमीन महसूल पद्धत आवश्यक त्या फेरबदलाने सर्व जहागिरीत लागू केली. सारा पिकांच्या उत्पन्नावर सारा निश्चित केला, शेती आणि बागाइतीला उत्तेजन दिले, तगाईच्या स्वरूपात शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली आणि शेतीव्यसायात सुधारणा व्हावी म्हणून काही वर्षे शेतसारा माफ केला. ही कामे/सेवा त्यांनी केली.
पुण्यातील आंबील ओढ्याला धरण बांधले. पुणे प्रदेशाच्या सुरक्षिततेची दादोजीने चोख व्यवस्था केली.
देशमुखीतील तंटे मोडून त्यांना स्वराज्याच्या कामगिरीत एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. अनेक भांडणांचे निवाडे केले. दादोजी एक ब्राह्मण  त्याने केलेले निवाडे औरंगजेबासही मान्य झाले, असे पहिल्या शहाजी राजांने त्याच्याविषयी उद्गार काढले. 

                        दादोजी कोंडदेव ह्यांना शिवाजीराजे यांचे पालक आणि स्वराज्याच्या प्राथमिक अवस्थेतील मार्गदर्शक ह्या नात्याने महत्वाचे स्थान आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कार्यास प्रारंभ होण्यापूर्वी दादोजी कोंडदेव  मरण पावले.
दादोजी कोंडदेव यांच्या निधनानंतर शिवाजी महाराजांनी असे  पत्रात म्हटलं आहे की, "आमच्या वडिलांनी आम्हाला दादोजींकडे पाठवलं. आता ते निवर्तले आणि आम्ही पोरके झालो."  यावरून महाराजांच्या मनात दादोजींबद्दल काय भावना होती, हे निश्चित कळते.

                          _ एकता चौधरी

स्वप्नअवस्था

स्वप्नअवस्था

मनातली स्वप्ने
पूर्ण कशी करु 
हवं ते मिळवण्यासाठी 
किती मी झुरु,

स्वतःच्या मनावर
ताबा कशी ठेऊ, 
अपयशातही संधी 
कशी मी शोधू, 

संपल्यावर सगळ
हार कशी मानू, 
पुन्हा नव्याने
कशी मी उभी राहू, 

ढवळून सारी स्वप्ने माझी
कशी मी आभाळाशी नेऊ, 
उंचावर पोहचायला
झेप कशी मी घेऊ....! 

Ekta chaudhari

Saturday 5 March 2022

|| कळी गुलाबाची ||

|| कळी गुलाबाची ||

एका छोट्याश्या रोपट्यावर 
उमलली नाजुकशी कळी, 
मिठी मारत पानांना
लाल चुटूक होती ती 
गुलाबाची कळी, 

फुलपाखरा ला अंगावर खेळुनी ती
होती ती गुलाबाची कळी, 
देखने रुप तिचे पाहुनी
लाजिरवाणी ती
 

तोडण्याची इच्छा होई मनी 
पण तिचे देखने रुप झाडाला च शोभि.

          
               _Ekta chaudhari

Thursday 3 March 2022

Mike Krieger, 4 march 1986

 Mike Krieger, 4 march 1986

                मित्रांनो, आज काल सर्वानकडे android mobile असतो/आहे. आणि मोबाईल म्हटले म्हणजे त्यात सगळया app चा समावेश असतो, परंतु त्यापैकी आज काल what's app, Facebook, Instagram, हे तीन app जास्तच महत्वाचे वाटते आणि अतिप्रमात वापरलं जाणार app म्हणजे च , "Instagram " . 
ह्या app मध्ये नवीन नवीन  features दिसुन येते. Ex:- reels आणि काय काय! 😅 बर असो, 
    
                 तर,  आज ४ मार्च . ४ मार्च १९८६ ला माईक क्रिगर यांचा जन्म झाला. ' माईक क्रिगर ' हे इंस्टाग्राम चे सह्संथापक आहे. आणि संस्थापक  ' सीईओ केविन '. 
केविन शिस्ट्रोम आणि मॅक क्रीगर यांनी ऑक्टोबर २०१० साली याची निर्मिती केली होती. इंस्टाग्राम ह्या app ला याला एप्रिल २०१२ facebook  कंपनीने विकत घेतले.
क्रिगर हे ब्राझिलियन-अमेरिकन उद्योजक आणि सॉफ्टवेअर अभियंता आहेत ज्यांनी केविन सिस्ट्रॉमसह Instagram सह-स्थापना केली आणि त्याचे CTO म्हणून काम केले. इंस्टाग्राम काही दशलक्ष वापरकर्त्यांपासून 1 अब्ज मासिक सक्रिय वापरकर्त्यांपर्यंत विस्तारित झाला तर क्रिगर यांनी CTO म्हणून काम केले. 

                  वर्ष 2012 मध्ये फेसबुकने इंस्टाग्रामला 1 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतले. आणि आज इन्स्टाग्रामच्या वापरकर्त्यांची संख्या 1 अब्जच्या पुढे गेली आहे.  केविन सिस्ट्रॉम आणि माईक क्रिगर यांनी अचानक राजीनामा दिल्याने फेसबुकच्या अडचणीत भर पडू शकते, कारण फेसबुकवर सध्या फेक न्यूज आणि निवडणुकांबाबत जगभरातून दबाव येत आहे. यासोबतच त्यांच्या राजीनाम्याचा परिणाम इन्स्टाग्रामवरही होऊ शकतो. हे एक कारण त्यांच्या राजीनाम्यात सांगितले आहे. आणि खरंच, फेसबुकवर सध्या फेक न्यूज दिसुन येत आहे! 
हा लेख लिहायचं कारण म्हणजेच आपण  Instagram app  वापरतोच तर त्या app ची थोडीफार माहिती आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. माईक क्रिगर यांचा जन्मदिन निमीत्यामुळे हे सगळ आज आपल्याला मला तुम्हाला नकीचं कळल आहे. तस पण Instagram app  वापरतो म्हटल्यावर हे जाणून घेण आवश्यक होतचं . 
  

                                _ Ekta chaudhari

मला आढळून आलेला क्षण

मी  बस मधून प्रवास करतांना मला आढळून आलेला क्षण, मित्रांनो कधी कधी तुम्हाला असं दृश्य नक्की च आढळून आला असेलच......

                 एकदा एक म्हातारा बस मध्ये चढतो, त्या बस मध्ये भरपुर लोकांची गर्दी त्याला दिसते. त्याला बसायला कुठेच जागा नसते.
लोकांनी आपले रूमाल, बॅंग बसच्या खिडकीतून टाकुन आपआपल्या जागा शिपुन ठेवलेल्या असते.
तो म्हातारा भिरभिर, इकडे-तिकडे बघून जागा शोधत असतो. तेव्हा त्याला एक सिट खाली दिसते, पण त्यावर फक्त रूमाल असतो. तो काही वेळ वाट बघतो, व त्या नंतर तेथे त्याला कुणीच न दिसल्यामुळे त्या सिट वर बसायला जातो.
                    तो बसल्यानंतर लगेच एक माणूस येतो, "ती माझी जागा आहे! " असं म्हणून तो त्या म्हाताऱ्याला उठवतो, आणि त्याच्या बाजुच्या सिट वर तो स्वत:ची बॅंग ठेवायची जागा करतो. तो बिचारा म्हातारा उभाच असतो. 
त्याला कोणीही बसायला जागा देत नाही.
तो शेवटी बस मध्ये आपली काठी ठेऊन खाली बसतो.
हे सगळं दॄश्य एक शाळेत जाणारी मुलगी बघत असते.
                     
                      ती मुलगी स्वत: उठून तिची जागा देऊन त्या म्हाताऱ्या कडे बघून म्हणते "आप्पाजी तुम्ही इथे बसा मी उभी राहते! " मग तो म्हातारा म्हणतो "बाई तु म्हटलं तेच खुप झाल". ती मुलगी त्या म्हाताऱ्या जवळ जाऊन त्याचा हात धरून त्याला उठवते आणि तिच्या जागेवर बसवते.
                          
                            तर, तात्पर्य एवढेचं की 'आपल्या पोळी वर तुप ओढणे 'म्हणजे च स्वत: चा फायदा साधुन घेणे.

                                 _एकता चौधरी

Wednesday 2 March 2022

जागतिक वन्यजीव दिन !

 जागतिक  वन्यजीव दिन   !     

                          मित्रांनो, आज ३ मार्च वन्यजीव दिन, म्हणजेच ( world Wildlife day)  हा दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो. आपल जे जग आहे ते आश्चर्यकारक प्राण्यांनी भरलेले आहे.
आपल्या प्रृथ्वी वर विविध प्राणी त्यांच्या जमाती आढळून येतात. 
जागतिक वाईल्डलाईफ दिवस हा दरवर्षी तीन मार्च रोजी साजरा केला जातो. वनस्पती आणि प्राण्यांच्या संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.हवेतील पक्ष्यांपासून ते समुद्रातील भव्य व्हेलपर्यंत, जागतिक वन्यजीव दिन हा आपल्या जगाप्रती असलेल्या आपल्या जबाबदाऱ्या आणि आपण ज्या जीवनासोबत सामायिक राहतो त्या जीवनाची आठवण करून देण्याचा दिवस आहे. 
मानव हा एकमेव जिवंत प्राणी नाहीच तर वनस्पतींपासून ते बुरशी आणि जीवाणूंपर्यंत इतर सजीवांच्या तुलनेत आपली संख्या खूप जास्त आहे. वन्यजीव हा आपल्या जगाचा महत्वपूर्ण भाग आहे. त्यांची आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे. 

                    

                         वन्यजीव दिन म्हणजेच ( world Wildlife day) हा दिवस जगभरातील  प्राण्यांबद्दल जागरुकता वाढविण्याबद्दल आहे. प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी जागतिक वन्यजीव दिन साजरा करणे आवश्यक आहे.
68 व्या वर्षी UN ने वन्यजीव दिन  घोषित केले आहे. 
जागतिक वन्यजीव दिन CITES सचिवालयाद्वारे राबविण्यात येतो, संबंधित UN संस्थांसोबत एकत्र काम करतो. 
जर तुम्हाला पृथ्वी आणि त्यावरील  प्रत्येक प्राणी जीव ह्या गोष्टीबद्दल उत्कट इच्छा असेल, तर हा दिवस साजरा करणे आवश्यक आहे.

                          

                      भारत देशातच ३४० सस्तन प्राणी, १२०० पक्षी, ४२० सरपटणारे प्राणी, १४० उभयचर प्राणी, २००० मासे आढळतात. मग संपूर्ण जगभर त्याची संख्या किती मोठी असेल याची कल्पना येते. सर्वत्र आढळणाऱ्या या वन्यजीवांविषयी जागरूकता पसरावी, त्यांचे स्वरक्षण आणि संवर्धन व्हावे, विलुप्त होणाऱ्या जमातींचे प्रमाण कमी व्हावे म्हणून तीन मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. 

💐𝙃𝘼𝙋𝙋𝙔  𝙒𝙊𝙇𝘿𝙒𝙄𝙇𝘿𝙇𝙄𝙁𝙀  𝘿𝘼𝙔 ✨

                                          _Ekta Chaudhari

आयुष्याचं साधन एक पुस्तक.....

आयुष्याचं साधन एक पुस्तक..... जिवनातला दुसरा आरसा म्हणजे पुस्तक आयुष्याच्या प्रवासात,  जग पालटुन टाकणार साधन म्हणजे पुस्तक, आपल्यकडे कसली तक...