Wednesday 16 March 2022

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर / १६ मार्च १६९३

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर / १६ मार्च १६९३ 
                  
                       16 मार्च  आज मल्हारराव होळकर यांची जयंती.१६ मार्च १६९३ साली मल्हारराव होळकर ह्यांचा जन्म झाला. त्याचं गाव पुणे नजीकचं ‘होळ’. या गावावरून त्यांना होळकर हे नाव मिळालं.  धनगर कुटुंबात जन्मलेले  एक सरदार होते. मल्हारराव होळकर  मराठ्यांच्या इतिहासातील एक कर्तबगार सेनापती व इंदूर संस्थानचे संस्थापक होते.
दुभती जनावरे आणि मेंढी पालन करणा-या भटक्या धनगर समजातील खंडूजी वीरकर चौगुला यांच्या घरात मुलगा जन्माला आला आणि त्याचे नामकरण मल्हार करण्यात आले. त्यावेळी धनगरी तांडा होळ मुक्कामी होता, "मुलाचे पाय पाळण्यात दिसतात" या उक्तीप्रमाणेच छोटा मल्हार तांड्यातील मुलांबरोबर खेळताना आपले गुण दाखवू लागला. मल्हार लहान असतानाच खंडूजीचा मृत्यू झाला आणि मल्हार व त्याच्या आईवर भाऊबंदांचा जाच वाढू लागला, म्हणून दोघांनी सुलतानपूर परगण्यातील तळोदे येथे भोजराज बारगळ मामाकडे आश्रय घेतला. होळ गावातील वास्तव्य संपले परंतु होळचे नाव त्यांच्यामागे  कायमचेच राहले.

                       मल्हारराव होळकर शिपाईगिरी करीत असतांना, बाजीराव पेशवे ह्यांच्याशी मैत्री झाली. आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर इसवी सन १७२९ च्या सुमारास त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळवली. मल्हारराव होळकर  ह्यांच्या चार पत्नी होत्या. १)  भोजराजमामांची मुलगी गौतमी हिच्या बरोबर मल्हाररावांचा विवाह झाला आणि त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव खंडेराव ठेवण्यात आले. २) द्वारकाबाई होळकर या मल्हारराव होळकरांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. द्वारकाबाई आणि मल्हारराव होळकर यांना एक मुलगी होती. ज्यांचे नाव सीताबाई होते. ३) बनाबाई होळकर या मल्हारराव होळकरांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. ४) हलकोबाई होळकर या मल्हारराव होळकरांच्या चौथ्या आणि शेवटच्या पत्नी होत्या.
 
                                माधवरावांच्या काळात मल्हारराव होळकर हे माधवरावांनाही वचकून असत. जाटांच्या पारिपत्याकरिता रघुनाथ - रावांबरोबर अलमपूर येथे आले असता तेथेच अतिश्रमाने वृद्धापकाळी मल्हाररावांचे निधन झाले.  मल्हारराव होळकर धाडसी व शूर होते.तर राजकारण आणि राज्यकारभारातही हुशार होते.बाळाजी बाजीराव व त्यानंतरचे पेशवेमाधवराव आणि दादासाहेब मल्हारराव होळकर  यांना पित्यासमान मान देत होते. व तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी  उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्याच्या कामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदीपर्यंत वाढविल्या.
मराठा साम्राज्याचा उत्तरेचा बुरुज..... मराठा भगवा पताका अटकेपार फडकवणारे श्रीमंत सुभेदार.... इंदौर संस्थानचे अधिपती.... अखंड आयुष्य मराठा साम्राज्याशी निष्ठा ठेवणारे... श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.....💐💐

-एकता चौधरी

No comments:

Post a Comment

आयुष्याचं साधन एक पुस्तक.....

आयुष्याचं साधन एक पुस्तक..... जिवनातला दुसरा आरसा म्हणजे पुस्तक आयुष्याच्या प्रवासात,  जग पालटुन टाकणार साधन म्हणजे पुस्तक, आपल्यकडे कसली तक...