Tuesday 15 March 2022

कृष्ण आणि बलदाऊ ह्यांचे होळी सोबतचे नाते.....!

कृष्ण आणि बलदाऊ ह्यांचे होळी सोबतचे नाते.....!                       

                         होळी या सणाला खुप महत्व आहे. परंतु,इतिहास पाहला तर भारतातील शेतकरी वर्गात होळी या सणाचे खास महत्त्व आहे. होळी या सणा चे सर्वात जवळचे नाते म्हणजे  कृष्णआणि बलराम. 

श्री कृष्ण आणि बलराम ह्यांचे होळी सोबतचे नाते.....! 

                      आपण या लेखात  पाहणार आहोत, तर मित्रांनो, रंगपंचमी हा वसंत ऋतूशी संबंधित महत्त्वाचा सण आहे. हा सण उन्हाळा संबंधित सण आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो. उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि थंडावा मिळावा यासाठी एकमेकांच्या अंगावर पाणी उडविण्याची रीत आहे.
संपूर्ण भारतामध्ये रंगपंचमीचा सण साजरा  अशा प्रकारे केला जातो.
श्री कृष्ण च्या काळात म्हणजे च द्वापरयुगात गोकुळात बाल कुमार कृष्ण आपल्या गोपाळ सवंगड्यांवर व बलराम /बलादाऊ सोबत पिचकारीने रंगीत पाणी उडवीत असे. बलराम हा श्रीकृष्णाचा सावत्र भाऊ होता,  श्रीकृष्ण जयंतीच्या एकदोन दिवस आधी,म्हणजे षष्ठीला बलराम जयंती असते.
दाऊजी बलदेव मंदिर,ब्रजभुमी मथुरा हुरंगा (होळी), होळीच्या नंतर एक दिवस साजरा केला जाणारा दाऊजी मंदिराचा हुरंगा जगभरात प्रसिद्ध आहे. दाऊजी या बलरामाचे मुख्य 'बलदेव मन्दिर' मथुरात आहे. बलराम ला श्रीकृष्ण चा मोठा भाऊ मानल्या जाते. 
तुम्हाला माहितच असेल कृष्ण, बाळगोपाळ किती नटखट होते ते बलदाऊ सोबत होळी च्या दिवशी गोकुळ मधल्या गोपिकांना रंगविण्यासाठी   वेगवेगळे तर्क लावत असे😃.
                          
                             त्या काळी पळसाच्या फुलापासुन रंग तयार केले जात होते.व याच बरोबरच फुलांच्या पाकळ्या, मेंहदी, गुलमोहराची पाने, टमाटर, हळद, डाळीचे पीठ, बीट अशा नैसर्गिक पदार्थांपासून रंग तयार केले जात असे.
होळी चा श्रीकृष्णाशी अतूट संबंध आहे. राधा-कृष्णाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून या सणाकडे पाहिले जाते. 
महाभारतातील एका कथेनुसार, युधिष्ठिराला श्रीकृष्णाने सांगितले होते- एकदा श्री रामाचे पूर्वज रघुच्या अधिपत्याखाली एक असुर स्त्री होती. कोणीही तिला मारू शकत नव्हते, कारण ती वरदानाने संरक्षित होती.  तीला कुणाची च भिती नव्हती परंतु, रस्त्यावर
खेळणाऱ्या मुलांशिवाय तीला कोणाचीच भीती वाटत नव्हती. तेव्हा
एके दिवशी गुरू वशिष्ठांनी सांगितले की -  लहान मुले हातात लाकडाचे तुकडे घेऊन  शहराच्या सीमेजवळ तर गेले आणि कोरड्या गवताचा ढीग करून त्या ढीक ला जर जाळले तर त्या असुर स्त्री मारले जाऊ शकते.
व हे सगळ करुन झाल्यावर गाणे, ढोल वोलवून नाच, नृत्य करा असे सांगण्यात आले व त्याच प्रमाणे हे सगळं करण्यात आले. म्हणून हा
दिवस एक सण म्हणून होळी साजरा केला जातो, जो वाईटावर निष्पपाप 
हृदयाचा विजय दर्शवितो.
व तसेच, 
                 राधा-कृष्णाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून या सणाकडे पाहिले जाते. त्याच वेळी, पौराणिक कथेनुसार, कंसाला जेव्हा गोकुळात कृष्णाच्या उपस्थितीची माहिती मिळाली तेव्हा त्याने गोकुळात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मारण्यासाठी पुतना नावाच्या राक्षसी  ला पाठवले. पुतना स्तनपानाच्या बहाण्याने लहान मुलांना विष पाजत होती. पण कृष्णाला त्याचे सत्य समजले. त्यांनी पुतना दूध काढत असताना ठार मारले. तेव्हापासून होळीचा सण साजरा करण्याची मान्यता सुरू झाल्याचे सांगितले जाते.
पुराणात सांगितले आहे की, एका राक्षस राजाचा मुलगा 'प्रल्हाद' 
भगवान विष्णूशिवाय, इतर कोणत्याही देवाची पूजा करत नाही,  तेव्हा तो राक्षस राजा संतप्त झाला आणि शेवटी त्याने आपली बहीण होलिकाला प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन अग्नीत बसण्याची आज्ञा दिली, कारण होलिका त्याच्याकडे होती. एक वरदान होत की आग त्याला इजा करू शकत नाही. पण नेमके उलटे घडले, होलिका जळून राख झाली आणि प्रल्हाद भक्ताला काहीही झाले नाही. याच घटनेची आठवण म्हणून या दिवशी होलिका दहन करण्याचा कायदा आहे. अशाप्रकारे भगवंत आपल्या अनन्य भक्तांचे रक्षण करण्यासाठी सदैव उपस्थित असतात हा संदेश होळीचा सण देतो. म्हणूनच  ह्या उत्सवाला "होलिकादहन" किंवा "होळी", असे म्हणतात. व महाराष्ट्रात होळीच्या दिवशी काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, व पेटलेल्या होळीभोवती प्रदक्षिणा घालतात. 
होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. व आपल्या महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे. आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो. 

                                        _एकता चौधरी


No comments:

Post a Comment

आयुष्याचं साधन एक पुस्तक.....

आयुष्याचं साधन एक पुस्तक..... जिवनातला दुसरा आरसा म्हणजे पुस्तक आयुष्याच्या प्रवासात,  जग पालटुन टाकणार साधन म्हणजे पुस्तक, आपल्यकडे कसली तक...