Sunday 27 February 2022

राष्ट्रीय विज्ञान दिन....

राष्ट्रीय विज्ञान दिन.... 

आज २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. देशाचे महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांनी आजच्या दिवशी  त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आज देशभरातील शाळा, महाविद्यालयात विज्ञान दिन साजरा केला जातो.
महान वैज्ञानिक भौतिक शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी भौतिकच्या गंभीर विषयावर एक महत्त्वपूर्ण शोध लावला होता. पारदर्शी पदार्थ मधून जाणाऱ्या प्रकाशांचा किरणात बदल करणारा हा बदल रामन यांनी शोधून काढला. त्यामुळे त्यांना १९३० साली भौतिकमध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार मिळवणारे ते केवळ पहिले भारतीय नव्हते तर आशियातील पहिले व्यक्ती होते. हा शोध लावल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ १९८६ पासून देशभरात या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. आज तसेच भारत या देशाला महान वैज्ञानिक परंपरा लाभली आहे. तसेच भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे देखील एक वैज्ञानिक च होते.

                     देशाच्या निर्मिती साठी विद्यानाची गरज आहे.
परंतु आपल्या देशातील काही भागात अंधश्रद्धा आणि रुढी-परंपरां दिसुन येत होत्या.आज विद्यानामुळे कमी प्रमाणात आढळून येते. विद्यानामुळे च हे चित्र पालटलेले दिसुन येत आहे. विद्यानामुळे संपूर्ण भारत देश समोर गेला आहे.
आज जगभरात "राष्ट्रीय विज्ञान दिन " साजरा करण्यासाठी काॅलेज, शाळा येथे प्रोजेक्ट ठेवल्या जात आहे व त्यातून माहिती प्राप्त करून घेत आहे.
देशाच्या विकासासाठी वैज्ञानिक विचारसरणीचा प्रसार आणि प्रचार होणे गरजेचे आहे . विद्यानामुळे, विद्यानाच्या सर्व शोधांनी सामान्य माणसाला देखील फायदा झालेला आहे. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या विद्यानाचे (science) चे महत्व सांगण्यासाठी राष्ट्रीय विद्यानदिन जगभरात साजरा करतात.

                           विज्ञानामुळे आपली प्रगती खूप वेगाने होत आहेच या शिवाय आपल्या समाजातील अंधश्रद्धा या ज्ञानामुळेच नष्ट झाल्या आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन हे विज्ञानामुळे झालेले चांगल्या प्रगतीचे लक्षण आहे. विज्ञानामुळे तरुण पिढीला नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लोकांना आर्थिक दृष्टिकोनातून विज्ञानाचा चांगला फायदा होत आहे. आपल्याला ज्या सुखसोई आता उपलब्ध आहेत, त्या फक्त आणि फक्त विज्ञानामुळे आहेत. विघ्यानक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान देखील केला जातो.
आणि लहान मोठ्या शोध, संशोधनांना प्रेरणा मिळावी ह्यासाठी अनेक योजना देखील जाहीर केल्या जातात. विज्ञान क्षेत्रात आज मोठ्या प्रमाणात प्राधान्य लाभलेले आहे.अतुलनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान देखील केला जातो.

               समाजात जनजागृती  करण्यासाठी तसेच , विज्ञानाची विचारसरणी जनमाणसात रुजू करण्यासाठी विज्ञान दिवस साजरी होणे महत्त्वाचे आहे. 
तर आज राष्ट्रीय विज्ञान दिन ह्या दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा.......! 

                       _ एकता चौधरी

No comments:

Post a Comment

आयुष्याचं साधन एक पुस्तक.....

आयुष्याचं साधन एक पुस्तक..... जिवनातला दुसरा आरसा म्हणजे पुस्तक आयुष्याच्या प्रवासात,  जग पालटुन टाकणार साधन म्हणजे पुस्तक, आपल्यकडे कसली तक...