Sunday 27 February 2022

मराठी राजभाषा दिन.....

मराठी राजभाषा दिन..... 

                       २७ फेब्रुवारी,आज मराठी राजभाषा दिन आपल्या महाराष्ट्राचे जेष्ठ कवी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन किंवा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. आज मराठी भाषा दिन असून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आपल्या मातृभाषेचा म्हणजे मराठीचा खूप अभिमान आहे. तसेच कवी कुसुमाग्रज यांनी आपल्या मराठी भाषेच्या सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. 
त्यामुळे कवी कुसुमाग्रज यांना अभिवादन आणि मराठी भाषेचा गौरव म्हणून दरवर्षी 'मराठी भाषा दिन' साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांचे संपूर्ण नाव विष्णु वामन शिरवाडकर आहे. 
   
                     

                  मराठी भाषा हा दिवस सर्वात जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा करतात. महाराष्ट्रातील लोकांना मराठी भाषेचा खुप अभिमान आहे. खंरतर संवादाचे मुख्य साधन म्हणजेच मराठी भाषा. मराठी भाषा ही मराठी संस्कृतीची ओळख आहे. मराठी मुल जन्माला आलं तेव्हा त्याचा पहिला शब्द हा मराठी मधूनच उद्धगारतो. मग तो शब्द आई असो किंवा बाबा असो. मराठी भाषा ही सर्वानसाठी खास असलीच पाहिजे, मराठी भाषेचा अभिमान आपल्या सर्वाना असलाच पाहिजे. परंतु आजच्या परिस्थितित इंग्रजी भाषेवरच ज्याचा त्याचा जोर दिसत आहे. परंतु इग्रंजी भाषा बोलतांना मराठी भाषेतला जो गोडवा असतो तो ह्या इंग्रजी भाषेत दिसत नाही.

                       

               दोन व्यक्ति जेव्हा भेटतात, बोलतात तेव्हा ते मराठी भाषेतच बोलतात, आणि ते दोन व्यक्ति बरेच दिवसानंतर किंवा वर्षानंतर भेटतात तेव्हा सुरुवाती ला हाच प्रश्न एकमेकांना विचारतात कि कसा आहेस रे बाबा तु! आणि ह्याच मराठी वाक्यात गोडवा दिसून येते. आणि तेच इंग्रजी भाषेत विचारुन बघा " How are you " ह्यातला तुम्हालाच फरक दिसुन येईल. म्हणूनच कुसुमाग्रज ह्यांनी असे म्हटले कि , 
                " परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी। माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपु नका।। भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे। गुलाम भाषिक होऊनि अपुल्या प्रगतिचे शिर कापु नका ॥ "

तर आज मराठी राजभाषा दिन ह्या दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा.🤝💐💐
 
                                           _ एकता चौधरी.

No comments:

Post a Comment

आयुष्याचं साधन एक पुस्तक.....

आयुष्याचं साधन एक पुस्तक..... जिवनातला दुसरा आरसा म्हणजे पुस्तक आयुष्याच्या प्रवासात,  जग पालटुन टाकणार साधन म्हणजे पुस्तक, आपल्यकडे कसली तक...