Wednesday 9 March 2022

सावित्रीआई फुले / १० मार्च १८९७

 सावित्रीआई फुले / १० मार्च १८९७
    
                       
                          भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि पहिल्या महिला शिक्षिका  सावित्रीआई फुले, आज १० मार्च, १० मार्च १८९७ रोजी सावित्रीआई चे निधन झाले.
मित्रांनो, तुम्हाला प्रश्न नक्की चं पडला असेल की मी या लेखात सावित्रीबाई फुले  न. म्हणता सावित्रीआई फुले का म्हटले असेल? 
तर, बाई या शब्दाचा अर्थ बरेच निघतात, 
उदा- बाई म्हणजे महिला आणि एखाद्या च्या घरात घरकामाला कामवाली असते तिला पण आपण बाई च म्हणतो तर बाई या शब्दाचा अर्थ वेगवेगळा होतो परंतु आई या शब्दाचा अर्थ मात्र एकच होतो . आणि सावित्रीबाई फुले ह्या सगळयांनसाठी आई समानच होत्या पुन्हा त्या पहिल्या महिला शिक्षिका  होत्या. आपण जेव्हा जन्माला येतो आल्यबरोबरच आपल्याला कहीच येत नसतं, पण जसं- जसं मोठ होत जातो, तसं -तसं आपली आईच आपल्याला प्रत्येक गोष्टिच वळण लावते तर ह्याच वरून कळते की आई आपली पहिली गुरु, शिक्षिका आहे. तर माझ्या मते आपण सावित्रीबाई फुले न म्हणता सावित्रीआई फुले म्हणायला हवं! 

                                सावित्रीआई फुले ह्यांना स्त्रीवादाची जननी मानल्या जाते.  त्याच बरोबरच सावित्रीआई फुले ह्या कवयित्री सुध्दा होत्या. ह्यांनचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी   नायगाव (ता.खंडाळा, जि. सातारा) येथील झाला. खंडोजी नेवसे-पाटील यांच्या   त्या कन्या होत्या.
त्यांच्या आईचे नाव ' सत्यवती नेवसे ' असे होते. इ. स. १८४० मध्ये ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचे लग्न झाले त्यावेळी ज्योतिबांचे वय तेरा वर्षाचे तर ,सावित्रीबाईंचे वय नऊ वर्षांचे होते. लग्न झाले तेव्हा त्या पूर्ण निरक्षर होत्या. 
त्या काळी बायकांनी शिकणे हे महापाप आणि त्यांना शिकविणे हे तर महाभयंकर पाप, असे त्या काळी सर्वच समाज समजत होता. परंतु  ज्योतिबांनी आपल्या अशिक्षित पत्नी सावित्रीआई यांना स्वतः घरी शिक्षण दिले व नंतर त्यांची शिक्षिका म्हणून शाळेत नेमणूक केली. तेव्हा सावित्रीबआई शाळेत जाऊन मुलींना शिकवू लागल्या. त्यावेळी त्या काळातील लोकांनी सावित्रीआईंना विविध प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली. सावित्रीआई शाळेत जात-येत असतांना लोक त्यांना अपमानास्पद भाषा वापरत आणि निंदा करीत.  काही  लोक त्यांच्या अंगावर चिखल-शेण फेकीत , त्यांना दगड मारीत पण सावित्रीआईंनी आपले काम निष्ठेने चालू ठेवले. 
   
                        महात्मा फुले यांनी विधवा स्त्रियांच्या निराधार मुलासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले.या गृहातील अनाथ मुलांची काळजी घेण्याचे काम सावित्रीआई करीत असे. या अनाथ मुलावर त्या मातेच्या वात्सल्याने प्रेम करीत व त्याची सर्व प्रकारची सेवा करीत होत्या. सावित्रीआई फुले , महात्मा फुले ह्यांना पुत्र नव्हते तर त्यांनी, एका अनाथ मुलाला ‘यशवंता’ ला त्यांनी दत्तक घेतले. व त्यानंतर सावित्रीआई फुले व त्यांचा मुलगा यशवंत ह्यांनी' नालासोपारा 'परिसरात बुबोनिक प्लेगच्या जगभरातील तिसऱ्या साथीच्या रोगाने प्रभावित झालेल्यांवर उपचार करण्यासाठी एक क्लिनिक उघडले.क्लिनिकची स्थापना पुण्याच्या बाहेरील भागात, संसर्गमुक्त भागात करण्यात आली. 
पांडुरंग बाबाजी गायकवाड यांच्या मुलाला वाचवताना सावित्रीबाईंचा वीरतापूर्वक मृत्यू झाला. गायकवाड यांच्या मुलाला मुंढव्याबाहेरील महार वस्तीत प्लेग झाला हे कळताच सावित्रीबाई फुले त्यांच्या पाठीशी धावून गेल्या आणि त्यांना पाठीवर घेऊन रुग्णालयात नेले. या प्रक्रियेत, सावित्रीबाई फुले यांना प्लेगची लागण झाली आणि १० मार्च १८९७ रोजी रात्री ९.०० वाजता सावित्रीआई फुले यांचा मृत्यू झाला. परंतु आजही त्यांचे आचार- विचार आपल्या स्मरणात आहे. त्या आज नसल्या तरी आजही विचारांच्या/ कर्तुत्वाच्या बाबतीत त्या आपल्यातच आहे. म्हणूनच, कष्टाने शिक्षण घेतलेल्या मुलीला किंवा स्त्रीला सावित्रीची लेक म्हणायची रीत पडली आहे. 

                                        _ एकता चौधरी

No comments:

Post a Comment

आयुष्याचं साधन एक पुस्तक.....

आयुष्याचं साधन एक पुस्तक..... जिवनातला दुसरा आरसा म्हणजे पुस्तक आयुष्याच्या प्रवासात,  जग पालटुन टाकणार साधन म्हणजे पुस्तक, आपल्यकडे कसली तक...