Wednesday 16 February 2022

कहानी शेतकऱ्यांची

कहानी शेतकऱ्यांची

 शेतात राब-राब राबुनी
काही न लागे त्याच्या हाती 
नशिबी त्याच्या माती-गोटी
तरीबी त्याच्या हसु ओठी ||

रुसे पाऊस कधी
फुकट जाई पेरणी
होई तयार पिक कधी 
कोसळत्या पावसात, 
 न्हाऊनी जाई कधी ||

कर्ज घेऊनी , भागवी गरजा 
कर्जबाजारी होऊनी, 
कशी कर्ज फेडणार 
होऊनी दुष्काळग्रस्त 
संकट येई मोठे ||

स्विकारुन मार्ग आत्महत्येचा 
ठरती कर्जबळी 
अशी शेतकऱ्याची कहानी 
ऐकुनी भरुनी येई डोळी ||

No comments:

Post a Comment

आयुष्याचं साधन एक पुस्तक.....

आयुष्याचं साधन एक पुस्तक..... जिवनातला दुसरा आरसा म्हणजे पुस्तक आयुष्याच्या प्रवासात,  जग पालटुन टाकणार साधन म्हणजे पुस्तक, आपल्यकडे कसली तक...