Tuesday 15 February 2022

जुन्या आठवणी

न कळताच वर्ष निघुन गेले, वयाने ही मोठे होत गेलो. भिंतीवर लावलेल्या फोटो कडे अलगदच लक्ष गेले. काही वेळ त्या फोटो कडेच बघत राहीले. त्या भिंतीवर लावलेल्या फोटो मध्ये जुन्या आठवणी दळलेल्या होत्या, अलगतच डोळे पानावून गेले.
बघता-बघता वर्ष निघुन गेलेत आणि त्यांच्या सोबत  च बालपन ही हरवून गेलं. फक्त आठवणी ओघळत राहिल्या, जुन्या गोड आठवणी नी मन भरले. फक्त बदलले नाही ते कॅलेंडर पानं तिच होती, तारखा पण त्याच होत्या, आणि वार सुध्दा तेच होते.बदलत गेलं फक्त साल.
मी फक्त त्या भिंतीवर लावलेल्या फोटो मध्ये जुन्या आठवणी शोधत होती. तो वेळ जुन्या आठवणींन मध्ये हरवून गेला.
जुन्या आठवणी आठवल्यात की, मन हळवं होत. हसुही येतं, हसता-हसता डोळयांन मधुन अश्रु ही येतं. जुन्या आठवणी आठवून आता असं वाटतं की बालपन चं चांगल होतं.

" हाक मारूनी मन आवाज देते   बालपना, कुठे तु हरवून गेलास, 
फक्त आठवणीत च तु जिवंत राहुनी
गेलास....... "

त्या बालपनाला मन हाक मारुन आवाज देत आहे. तरी ही ते बालपन आठवणी मध्येच गुंतलेल आहे.

😇😇😇

No comments:

Post a Comment

आयुष्याचं साधन एक पुस्तक.....

आयुष्याचं साधन एक पुस्तक..... जिवनातला दुसरा आरसा म्हणजे पुस्तक आयुष्याच्या प्रवासात,  जग पालटुन टाकणार साधन म्हणजे पुस्तक, आपल्यकडे कसली तक...