Wednesday 23 February 2022

शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज

शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज " २४ फेब्रुवारी १६७० "
   
                  आज24 फेब्रुवारी "छत्रपती राजाराम महाराज" ह्यांनची जयंती. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र आणि मराठेशाहीतील तिसरे छत्रपती. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १६७० रोजी शिवपत्नी सोयराबाईंच्या पोटी राजगडावर झाला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रसंगामुळे संपूर्ण मराठी स्वराज्य हादरले. कठीण प्रसंगी सारासार बुद्धीने विचार करू शकतील असे काही लोक शिवाजी महाराजांनी अगोदरच मिळवून ठेवले होते. यामध्ये रामचंद्रपंत अमात्य, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, शंकराजी नारायण, प्रल्हाद निराजी इत्यादींचा समावेश होता. या सर्व मंडळींनी राजाराम महाराजांचा राज्याभिषेक केला. संभाजी महाराजांच्या मृत्यु वेळेस राजाराम महाराज 
यांचे वय १९ वर्षाचे होते. 
राजाराम राजे ह्यांचे चार लग्न/विवाह झाले . त्यातील पहिलं लग्न १५ मार्च १६८० रोजी जानकीबाई ह्यांनच्याशी झालं.
काही वर्षानंतर जानकीबाई ह्यांचे निधन झाले. आणि त्यानंतर दुसरे लग्न ताराबाई मोहिते ह्यांनच्याशी झालं. त्यानंतर महाराजांचे तिसर लग्न राजसबाई ह्यांनच्याशी झालं.व त्यानंतर आणखी एक लग्न अंबिकाबाई ह्यांनच्याशी झालं. 
      
                  सन १६७९ ते १७००पर्यंत महाराष्टावर सतत स्वाऱ्या होत होत्या, दुष्काळ, जाळपोळ यामुळे महाराष्ट्र खचून गेला होता. राज्याची तिजोरी नाही, राजा परागंदा, पुरेशी फौज नाही अशा काळात वतनदाऱ्या बहाल करण्याशिवाय दुसरा पर्याय राजाराम महाराजांसमोर नव्हता असे वाटते. पण नंतर याचे भंयकर दुष्परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागले.राजाराम हे मुळातच शांत स्वभावाचे राजे होते. त्यांनी राज्यकारभाराची घडी व्यवस्थित घालण्याचा प्रयत्न केले व त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले.सततची धावपळ, सोबत वाईट प्रकृती व यामुळे राजाराम महाराज लवकरच वारले. परंतु त्या आधी त्यांनी शिव चरित्र लिहुन घेतले होते. राजाराम महाराज ह्यांनच्या दोन राजमुद्रा होत्या.
 १)         " प्रति:पात चंन्द्रलेखीव वर्धीष्णू विश्ववंदिता |
           शिवासुनोरीयंमुद्रा राजारामस्य विराज्यते || "
 
२)          " धर्मप्रद्योदिताशेषवर्णा
दाशराथेरीव | राजारामस्य मुद्रेय विश्ववंद्या विराजते || "

                     
                                  _ एकता चौधरी.

             

No comments:

Post a Comment

आयुष्याचं साधन एक पुस्तक.....

आयुष्याचं साधन एक पुस्तक..... जिवनातला दुसरा आरसा म्हणजे पुस्तक आयुष्याच्या प्रवासात,  जग पालटुन टाकणार साधन म्हणजे पुस्तक, आपल्यकडे कसली तक...