Sunday, 27 February 2022
राष्ट्रीय विज्ञान दिन....
मराठी राजभाषा दिन.....
Thursday, 24 February 2022
राजमुद्रा
Wednesday, 23 February 2022
शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज
Tuesday, 22 February 2022
चहाबाज
Monday, 21 February 2022
शिर आहे पण प्राण नाही.....❗
जीव आहे पण जिवंतपणाची जाणिव चं नाही,
असं पण म्हणता येईल की,
शिर आहे पण प्राण नाही.....❗
शिर आहे पण प्राण नाही.... .
जन्म म्हणजे काय? हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडला असेल, " एखादा जीव जन्मला तो मरेपर्यतचा जो प्रवास असतो, त्याला आपण जन्म/जिवन म्हणतो" जीवनाच्या प्रवासात माणूस एकटाच येतो आणि एकटाच जातो. प्रत्येक मनुष्याच्या जिवनात अनेक प्रकारचे संकट येतात आणि मनूष्य प्रत्येक संकटांवर मात करून समोर जातो.तर, काही मनूष्यांना संकटांवर मात करता येत नाही म्हणून ते आत्महत्येचा मार्ग स्विकारतो.आपण आपले जिवन स्वत:साठी नव्हे तर, इतरांनसाठी जगायला हवे.
जो मनुष्य आत्महत्येचा मार्ग स्विकारून आत्महत्या करतो, तो मेल्यावर त्याला काहीच त्रास होत नाही.तर, त्याचे जे आपले लोक असतात त्यांना तो त्रास देऊन जातो.
कसं आहे नां, जन्म आहे, जिवन आहे पण जिवंतपणाची जाणिव च नाही. आयुष्य किती दिवसाचे असते हे कुणालाच माहिती नसते, आजचे अस्तित्व उद्या नसते.
उद्या काय होईल हे कुणालाच माहिती नसते.आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही, आणि दुखा:पासुन आजपर्यंत कोणीही वंचित राहलेल नाही.
सध्याच्या परिस्थितित असं झाल आहे की, नाकाला लाभणारा सुगंध आहे पण तो ही घेता येत नाही. माणसाच्या गर्दीत हवा असलेला सहवासही नाही, नाती आहे.तस सगळ आहे, पण त्या असण्याला अर्थ राहला नाही.सगळ काही असुन सुध्दा काहीतरी हरविल्याची हूरहुरता मात्र नक्की आहे. जन्म आहे पण जिवंतपणाची जाणिव च नाही.
आज असं झाल आहे, कोणी जगेल, कोणी मरेल याचा काही भरवसाच नाही, आनंद हा आता एक प्रकारचा आभासच म्हणून राहलेला आहे. प्रत्येक मनुष्य सुखा:च्या
मागे धावत असतो. सहजा-सहजी सुख प्राप्त होत नाही.
सुख हे क्षणभंगुर असते.आपल आयुष्य हसत खेळत जगायचं असते. गरीबांनाही दुख: असतात, आणि श्रीमंतानाही दुख: असतात.असं नाही की, तो श्रीमंत आहे त्याला दुख: आहेचं नाही, जरी तो श्रीमंत असला. त्याच्याकडे भरभक्कम संपत्ति असली तरी त्याला सर्व सुख मिळेलच असे नाही. दुखा:पासुन कोणीही वंचित नाही.
माणसाचं आयुष्य त्याच्या कर्मावर अवलंबून असते.त्यांनी जेवढे चांगले कर्म केले त्याचं त्याला नक्कीच फळ मिळतं आणि आयुष्यात किती ही चांगली कर्म करा पण कौतुक मात्र स्मशानातच होत. माणसाला जीवन हे एकदाच मिळालेल असतं. त्या जीवनाच सोन कसं
करता येईल हे त्यानेच ठरवायचं असतं. कोणी सुखा:च्या तोंडातून पाय ओढले म्हणून परतायचं नसतं. अपयश आले म्हणून प्रयत्न थांबवायचे नसते.म्हणूनच म्हटलेल आहे "प्रयत्नांती परमेश्वर" म्हणूनच मित्रांनो, हसत- खेळत आनंदी जिवन जगा, कुठल्याही परिस्थितिवर मात करायला शिका, कर्म चांगले कराल तर नक्कीच त्याचं तुम्हाला फळ मिळेल. कुठल्याही गोष्टिचा गर्व करू नका.शेवटी गर्वाचे घर खालीच असते.
Sunday, 20 February 2022
माझ्या प्रश्नांची उत्तरे...
आई
INTERNATIONAL MOTHER LANGUAGE DAY
ईवली ईवली चिमणी
Saturday, 19 February 2022
world day of social justice
Friday, 18 February 2022
रयतेचा राजा
||जाणता राजा||
Wednesday, 16 February 2022
दु:ख सांगावे कुणाला!
कहानी शेतकऱ्यांची
Tuesday, 15 February 2022
जुन्या आठवणी
Monday, 14 February 2022
अंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन
आयुष्याचं साधन एक पुस्तक.....
आयुष्याचं साधन एक पुस्तक..... जिवनातला दुसरा आरसा म्हणजे पुस्तक आयुष्याच्या प्रवासात, जग पालटुन टाकणार साधन म्हणजे पुस्तक, आपल्यकडे कसली तक...

-
शेतकऱ्याचे छायाचित्र/ Farmer img गुगल वर सर्चिंग करीत असतांना ही ह्रदयस्पर्शी पोस्ट आढळून आली. पोस्ट कोणी तयार केले हे माहीती नाही.पण मात्र ...
-
छत्रपती संभाजी महाराज 11 मार्च 1689 मित्रांनो आज 11 मार्च, 11 मार्च 1687 रोजी छत्रपती संभाजी राजे ह्यांचे निधन झाले....
-
कृष्ण आणि बलदाऊ ह्यांचे होळी सोबतचे नाते.....! होळी या सणाला खुप महत्व आहे. परंतु,इतिहास पाह...